- ऋजुता लुकतुके
टेनिस हा एरवी ताकदीचा खेळ मानला जातो. त्यामुळे या खेळात पस्तीशीतील खेळाडूंना स्थान नाही, असा लोकांचा समज आहे. पण, नोवाक जोकोविच आणि मागोमाग दुहेरीत रोहन बोपान्नाने तो बाद ठरवला आहे. आताच्या घडीला दोघेही अनुक्रमे एकेरी आणि दुहेरीत क्रमवारीत अव्वल आहेत. आणि वयाने सर्वात जास्त वयात हा मान पटकावल्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. रविवारीच नोवाक जोकोविचने या बाबतीत रॉजर फेडररला मागे टाकलं. ३६ व्या वर्षी तो वयाने सगळ्यात मोठा अव्वल खेळाडू ठरला आहे. (Novak Djokovic Rohan Bopanna)
टेनिसमध्ये एकाच वेळी एकेरी आणि दुहेरीतील अव्वल खेळाडू हे पस्तीशी ओलांडलेले आहेत. त्यामुळे काय संदेश जातो असा प्रश्न जोकोविचला विचारला असता, त्याने मजेशीर उत्तर दिलं. ‘आम्ही ५०-५० नाही आहोत. आमचं एकत्र वय ८० आहे. यातील मोठा हिस्सा बोपान्नाने व्यापला आहे. तो मोठा आहे,’ असं जोकोविच म्हणाला. पण, त्याचबरोबर इथपर्यंतच्या प्रवासाचं श्रेय निष्ठा आणि समर्पणाला दिलं. (Novak Djokovic Rohan Bopanna)
‘मी बोपान्नाला अनेकदा जिममध्ये एकटा काम करताना पाहिलंय. तो त्याच्या सपोर्ट स्टाफबरोबर तिथं घाम गाळत असतो. त्याची मेहनत लपून राहत नाही. खेळावरील प्रेमामुळे आम्ही खेळात टिकून आहोत. आणि आमच्यातील नव्या गोष्टी सतत शोधून काढत असल्यामुळे आम्ही ताजेतवाने आहोत,’ असंही पुढे जोकोविच म्हणाला. (Novak Djokovic Rohan Bopanna)
“Old is Gold.” 👑
Words of wisdom from the oldest singles and doubles No. 1’s in PIF ATP Rankings history 💪@DjokerNole 🤝 @rohanbopanna pic.twitter.com/KYR7QsDiKz
— ATP Tour (@atptour) April 8, 2024
(हेही वाचा – Pratik Patil: प्रतिक पाटील प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला; मविआचं गणित बिघडणार ?)
रोहन बोपान्ना ठरला या दोन स्पर्धांमध्ये विजेता
रोहन बोपान्नाने जोकोविचला भारतात येण्याचं आमंत्रण दिलं आणि जोकोविचने तत्त्वत: ते स्वीकारलंही. भारतात एकत्र काहीतरी करता येईल. आणि टेनिससाठी कुठेही प्रवास करायला आपण तयार आहोत, असं जोकोविच म्हणाला. जोकोविच यापूर्वी इंडियन टेनिस लीगच्या निमित्ताने २०१४ मध्ये एकदा भारतात आला होता. (Novak Djokovic Rohan Bopanna)
जोकोविच सध्या नंबर वन असला तरी ऑस्ट्रेलियन ओपन आणि त्यानंतर इंडियाना वेल्स स्पर्धेत तो लवकर बाद झाला होता. त्यामुळे एटीपी १००० मास्टर्स स्पर्धेत तो विजयासाठी निकराचा प्रयत्न करणार आहे. तर रोहन बोपान्ना ऑस्ट्रेलिया ओपन आणि मियामी ओपन या दोन स्पर्धांमध्ये विजेता ठरला आहे. त्याच्याच जोरावर ४३ व्या वर्षी त्याने दुहेरीत अव्वल स्थान पटकावलं. (Novak Djokovic Rohan Bopanna)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community