- ऋजुता लुकतुके
३७ वं वर्षं सुरू असलेल्या नोवाक जॉकोविचने (Novak Djokovic) २०२३ मध्ये ४ पैकी ३ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. (Novak Djokovic)
नोवाक जॉकोविचने (Novak Djokovic) २०२३ साली ३ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकून आपली ग्रँडस्लॅम विजेतेपदांची संख्या २४ वर नेली. खेळाच्या इतिहासातील तो सर्वात यशस्वी टेनिसपटू आहे. पण, त्याची विजेतेपदांची भूक अजूनही शमलेली नाही. उलट नवीन हंगामापूर्वी, ‘तरुण खेळाडूंमुळे माझी ईर्ष्या आणखी वाढली’ असल्याची गर्जनाच त्याने कली आहे. (Novak Djokovic)
तरुण खेळाडू माझ्यातील जनावर जीवंत करतात
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आता तो पुढे आहे. अजूनही तो जिंकतोय. नाही म्हणायला यावर्षी डेव्हिस चषक स्पर्धेत (Davis Cup Tournament) २२ वर्षीय यानिक सिन्नरने त्याला मात दिली आणि कार्लोस अल्काराझने विम्बल्डन विजेतेपद त्याच्याकडून हिसकावून घेतलं. (Novak Djokovic)
आणि असे तरुण नवीन खेळाडू समोर आले की, जिंकायला नवी ऊर्जा मिळते, असं जॉकोविचने (Novak Djokovic) आता म्हटलंय. ‘जिंकण्याची इच्छा असणारे आणि तशी क्षमता असलेले खेळाडू समोर आले तर मला खेळाची आणखी मजा वाटते आणि जिंकण्याची उर्मीही वाढते. असे तरुण खेळाडू माझ्यातील जनावर जीवंत करतात,’ अशी प्रतिक्रिया त्याने तरुण खेळाडूंविषयी बोलताना एका टीव्ही वाहिनीला दिली आहे. (Novak Djokovic)
(हेही वाचा – NIA कडून २० संशयितांची चौकशी, कल्याणच्या तरुणाचा समावेश)
विम्बल्डन पराभवाबद्दल जॉकोविच म्हणाला…
खासकरून अल्काराझचं त्याने कौतुक केलं. अल्काझार आणि जॉकोविच (Novak Djokovic) यावर्षी चारदा आमने सामने आले आणि यातल्या तीनवेळा जॉकोविच (Novak Djokovic) जिंकला. फ्रेंच ओपनमध्ये स्पॅनिश अल्काराझला पायात गोळे आल्यामुळे नीट लढत देता आली नव्हती. पण, त्याचा खेळ संपूर्ण असल्याची पावती त्याला नंबर वन खेळाडू जॉकोविचकडून (Novak Djokovic) मिळाली आहे. ‘विम्बल्डनमध्ये त्याने माझा केलेला पराभव मला अमेरिकन ओपनमधील विजयासाठी प्रेरणा देऊन गेला,’ असं आता जॉकोविच म्हणतोय. (Novak Djokovic)
थोडक्यात, २०२४ हंगामातही आपल्याला जॉकोविच (Novak Djokovic) तळपताना दिसणार आहे आणि याच महिन्यात ब्रेबोर्नमध्ये युनायटेड चषकाच्या माध्यमातून राफेल नदालही कोर्टवर पुनरागमन करणार आहे. त्यामुळे जॉकोविच (Novak Djokovic) आणि नदाल अशी जुगलबंदीही चाहत्यांना बघायला मिळणार आहे. (Novak Djokovic)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community