-
ऋजुता लुकतुके
नोवाक जोकोविच यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन (Australian Open 2024) स्पर्धेत आपल्या २५व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी खेळत आहे. रविवारी २०व्या मानांकित ॲडरियन मॅनेरिओला त्याने चक्क ६-०, ६-० आणि ६-३ अशी धूळ चारली. त्याचा धडाका बघून रॉड लेव्हर अरेनामधील प्रेक्षकही अवाक झाले होते. स्पर्धेच्या ११ व्या विजेतेपदाच्या दिशेनं त्याने वाटचाल सुरू ठेवली आहे.
‘तिसऱ्या सेटमध्ये मला जाणून बुजून एखादा गेम हरायचा होता. त्यामुळे स्टेडिअममधील तणाव थोडा कमी झाला असता. कारण, मी एकही गेम न हरता हा सामना जिंकेन याचं दडपण सगळ्यांनाच आलं होतं. मला एक गेम हरून मग पुन्हा सामन्यावर लक्ष केंद्रीत करायचं होतं,’ असं आपल्या नेहमीच्या उपरोधिक शैलीत नोवाक म्हणाला तेव्हा प्रेक्षकांमध्येही हशा पिकला.
(हेही वाचा – Ayodhya Shri Ramlala Pratishtha : श्रीरामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर काय म्हणतात पाकिस्तानची प्रसारमाध्यमे?)
10/10 from the 10-time champion 🌟@DjokerNole • #AusOpen • #AO2024 pic.twitter.com/Tg2NxgmMBm
— #AusOpen (@AustralianOpen) January 21, 2024
नोवाक जोकोविचने ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपउपान्त्य फेरी गाठण्याची ही ५८ वी वेळ आहे. आणि रॉजर फेडररच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली आहे. पुढचा सामना टेलर फ्रीत्झ बरोबर आहे. आणि तो जिंकून फेडररचा हा विक्रम मोडण्याची संधी त्याला आहे.
Where there’s a record there’s Novak Djokovic! pic.twitter.com/uldKFxIJ7l
— US Open Tennis (@usopen) January 21, 2024
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये (Australian Open 2024) नोवाक जोकोविच सलग ३२ सामने आतापर्यंत जिंकला आहे. २०२२ मध्ये कोरोनाची लस न घेतल्यामुळे तो खेळू शकला नव्हता. २०२४ हंगामाची सुरुवात ३६ वर्षीय नोवाक जोकोविचसाठी धिमी झाली होती. सुरुवातीला त्याला तापही आला होता. पण, पहिल्या दोन फेऱ्यांनंतर तो सावरला आहे. आणि मॅनेरिओ विरुद्ध तर त्याने कमालच केली. फ्रेंच मॅनेरिओने गेल्या हंगामात तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. पण, जोकोविचने त्याला लिलया हरवलं. अख्ख्या सामन्यात मॅनेरिओ फक्त तीन गेम जिंकू शकला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community