सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) यूएस ओपन २०२३ (Us Open 2023) चे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम फेरीत रशियाच्या डॅनियल मेदवेदेवचा पराभव करत जोकोविचने चौथ्यांदा अमेरिकन ओपनवर आपलं नाव कोरलं आहे. जोकोविचचे हे २४ वे ग्रँडस्लॅम आहे. त्याने ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या बाबतीत मार्गारेट कोर्टची बरोबरी केली आहे. पुरुष एकेरीत 24 ग्रँडस्लॅमसह सर्वाधिक विजेतेपद पटकावणारा अशी आता जोकोविचची (Novak Djokovic) ओळख झाली आहे.
जोकोविचने मेदवेदेवचा सरळ सेटमध्ये केला पराभव
न्यूयॉर्कच्या मार्गारेट कोर्टवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात जोकोविचने (Novak Djokovic) डॅनियल मेदवेदेवचा ६-३, ७-६, ६-३ असा पराभव केला. ३६ वर्षीय जोकोविचने पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. मेदवेदेवने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, मात्र जोकोविचने दुसरा सेटही ७-६ असा जिंकला.
तिसऱ्या सेटमध्ये ६-३ असा सहज विजय मिळवत त्याने (Novak Djokovic) आपले विक्रमी २४ वे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले. २०२१ मध्ये यूएस ओपनच्या फायनलमध्ये जोकोविचला मेदवेदेवविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
(हेही वाचा – IND vs PAK Asia Cup 2023: उर्वरित सामना सोमवारी होणार; पुन्हा पाऊस पडल्यास काय होणार?)
Novak Djokovic continues to write history.@AustralianOpen | @rolandgarros | @Wimbledon pic.twitter.com/RrBFOQdiN6
— US Open Tennis (@usopen) September 11, 2023
“मी याची कधीच कल्पना केली नव्हती!”
दरम्यान, विजयानंतर जोकोविचने (Novak Djokovic) भावनिक प्रतिक्रिया दिली. “मी कधीच कल्पना केली नव्हती की कधीतरी मी अशा प्रकारे तुमच्यासमोर उभा राहून माझ्या २४व्या ग्रँडस्लॅमविषयी बोलेन. हे कधी प्रत्यक्षात उतरेल याचा मी कधीच विचार केला नव्हता. पण गेल्या दोन वर्षांत मला असं वाटू लागलं होतं की मी हे करू शकतो. मला संधी आहे. मला इतिहास घडवण्याची संधी असेल तर मी ती का घेऊ नये?” अशी प्रतिक्रिया ३६ वर्षीय जोकोविचने (Novak Djokovic) दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community