
- ऋजुता लुकतुके
व्यावसायिक क्रिकेटपटू होण्यासाठी शालेय जीवनापासूनच क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात होते. पण, शारीरिक शिक्षणाच्या तासालाही हा विषय कधी अभ्यासक्रमात नसतो. मैदानात तो खेळणं हा तर दूरचा विषय. त्यामुळे अभ्यासक्रमातील ही त्रुटी भरून काढण्यासाठी आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने पुढाकार घेऊन थेट विद्यापीठ पातळीवर क्रिकेटमध्ये पदवी (Degree in Cricket) अभ्यासक्रम सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. एमसीए आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात तसा सामंजस्य करारही झाला आहे आणि क्रिकेटमध्ये पदवी (Degree in Cricket) अभ्यासक्रम लवकरच सुरूही होणार आहे.
त्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांनी मोठं पाऊल उचललं आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन लवकरच मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने असा पदवी अभ्यासक्रम सुरू करणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
(हेही वाचा – Ladki Bahini Yojana : लाडकी बहीणींना फेब्रुवारीचा हफ्ता कधी मिळणार ? माहिती आली समोर)
“क्रिकेट हा व्यावसायिक खेळ झाला आहे. त्यासाठी अनेक क्षेत्रांतून मदत मिळत असते. खेळपट्टी तयार करणे, व्हिडीओ विश्लेषक, प्रशिक्षण, स्कोअरिंग, पंच यांसारख्या विविध बाबींमध्ये प्रावीण्य असलेले लोक या खेळाला हवे आहेत. त्यासाठी हा प्रयत्न असेल. येत्या जून-जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू होईल. यासाठी दहा हजार मुलांची नोंदणी सुरुवातीला होणार आहे. मैदानावर ज्यांची कारकीर्द घडत नाही, त्यांनाही यातून नवीन संधी मिळणार आहे,” असं मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षचे अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) त्यांनी सांगितले.
मुंबईतील अनेक क्लब खाजगीरित्या आपल्या खेळाडूंसाठी इंग्लंडचा दौरा आयोजित करतात. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनने यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबईतील युवा खेळाडूंसाठी इंग्लंडचा दौरा आयोजित करण्यात येणार आहे. एमसीए कार्यकारिणी बैठकीत या निर्णयावरही शिक्कामोर्तब करण्यात आले. (Degree in Cricket)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community