Nuwan Thushara Hat-Trick : मुंबई इंडियन्सचा नवीन ‘मलिंगा’ नुवान थुशाराची हॅट – ट्रीक 

Nuwan Thushara Hat-Trick : आयपीएलची चाहूल लागलेली असताना मुंबई इंडियन्ससाठी हा चांगली बातमी आहे

194
Nuwan Thushara Hat-Trick : मुंबई इंडियन्सचा नवीन 'मलिंगा' नुवान थुशाराची हॅट - ट्रीक 
Nuwan Thushara Hat-Trick : मुंबई इंडियन्सचा नवीन 'मलिंगा' नुवान थुशाराची हॅट - ट्रीक 
  • ऋजुता लुकतुके

श्रीलंका विरुद्ध बांगलादेश टी-२० मालिकेत नुवान थुशाराने हॅट – ट्रीकसह ५ बळी घेऊन या मालिकेवर आपला ठसा उमटवला. २२ मार्चपासून आयपीएल सुरू होत असल्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) ही चांगली बातमी आहे. कारण, मुंबई फ्रँचाईजीने यंदाच्या हंगामात ४.२ कोटी रुपये खर्चून नुवानला खरेदी केलं आहे. (Nuwan Thushara Hat-Trick)

(हेही वाचा- French Open Badminton : सात्त्विकसाईराज आणि चिरागने दुसऱ्यांदा जिंकली फ्रेंच ओपन सुपरसीरिज )

या सामन्यात श्रीलंकेनं बांगलादेशला (Sri Lanka vs Bangladesh) १४६ धावांत गुंडाळलं. आणि यात नुवानची भूमिका मोलाची होती. मालिकेतील पहिलाच सामना खेळताना पहिल्या षटकात पाचव्या चेंडूवर त्याने बांगला कर्णधार नजमुल हुसेनला एका धावेवर त्रिफळाचीत केलं. त्यानंतर चौहिद ह्रदयला त्याने भोपळाही फोडू दिला नाही. महमदुल्ला रियादला पायचीत पकडून त्याने हॅट – ट्रीक पूर्ण केली. (Nuwan Thushara Hat-Trick)

‘सामन्यात रिषाद हुसेन (५३) आणि तस्किन अहमद (३१) यांनी रंगत निर्माण केलेली असताना हॅट ट्रीक करून संघाला विजय मिळवून देता आला याचा मला आनंद आहे. माझ्या कारकीर्दीतला हा पहिलाच विजय आहे,’ अशी प्रतिक्रिया विजयानंतर नुवानने दिली आहे. (Nuwan Thushara Hat-Trick)

नुवान थुशाराने या सामन्यात १५ धावांमध्ये ५ बळी मिळवले. मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या लिलावात नुवान थुशाराबरोबरच दिलशान मधुशंकालाही करारबद्ध केलं आहे. मधुशंकासाठी मुंबईने ४.६ कोटी रुपये मोजले आहेत. नुवान थुशाराच्या या कामगिरीमुळे श्रीलंकेनं टी-२० मालिकाही २-१ अशी जिंकली आहे. (Nuwan Thushara Hat-Trick)

(हेही वाचा- Ravindra Waikar यांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले ..)

या मालिकेनंतर दोन्ही संघ २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल लीगसाठी सज्ज झाले आहेत.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.