ODI World Cup 2027 : २०२७ च्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघ किती एकदिवसीय सामने खेळणार?

भारतीय संघाचं पुढील ४ वर्षांचं आंतरराष्ट्रीय वेळापत्रक.

78
ODI World Cup 2027 : २०२७ च्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघ किती एकदिवसीय सामने खेळणार?
ODI World Cup 2027 : २०२७ च्या विश्वचषकापूर्वी भारतीय संघ किती एकदिवसीय सामने खेळणार?
  • ऋजुता लुकतुके

२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात उपविजेता ठरलेला भारतीय संघ आता एकदिवसीय आणि टी-२० अशा दोन्ही प्रकारात सातत्यपूर्ण खेळ करताना दिसत आहे. मागच्या तीन आयसीसी स्पर्धांमध्ये मिळून भारताने २३ पैकी आपले २१ सामने जिंकले आहेत. २०२३ च्या अंतिम फेरीतील एक पराभव आणि एक अनिर्णित सामना सोडला तर भारताने प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. अलीकडे टी-२० च्या वाढत्या प्रभावाखाली एकदिवसीय क्रिकेट कमी होत चाललं आहे. पण, २०२७ च्या पुढील एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतीय संघ एकूण २७ एकदिवसीय सामने खेळणार आहे. (ODI World Cup 2027)

आयपीएल पार पडल्यानंतर भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा (England) दौरा करेल. तिथून परतल्यावर भारतातच बांगलादेशविरुद्ध ३ सामन्यांची मालिका होणार आहे. ऑगस्ट – सप्टेंबर कालावधीत हे तीन सामने होतील. तर ऑक्टोबर – नोव्हेंबर २०२५ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाशी ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. आणि या वर्षाच्या शेवटी भारतीय संघ नोव्हेंबर – डिसेंबर कालावधीत दक्षिण आफ्रिकेबरोबर (South Africa) मायदेशातच ३ सामन्यांची मालिका खेळणार आहे.

(हेही वाचा – Assam Government निर्माण करणार स्वतःचा उपग्रह; इस्रोशी चर्चा सुरु, मुख्यमंत्र्यांची माहिती)

जानेवारी २०२६ मध्ये न्यूझीलंडचा संघ भारतात ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी येईल. चॅम्पियन्स करंडकानंतर दोन संघातील ही पहिली मालिका असेल. त्यानंतर भारत आणि श्रीलंकेत संयुक्तपणे टी-२० विश्वचषक स्पर्धा पार पडणार आहे. आणि पुढे आयपीएलचा एकोणीसावा हंगाम असेल. आणि तो झाला की, भारतीय संघ मायदेशात अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा इंग्लंडला जाईल. आणि तिथे ३ एकदिवसीय सामने तसंच ५ टी-२० सामन्यांची मालिका उभय देशांमध्ये होईल.

त्यानंतर सप्टेंबर – ऑक्टोबर २०२६ मध्ये वेस्ट इंडिजचा (West Indies) संघ भारताचा दौरा करणार आहे. आणि यात ३ एकदिवसीय सामने असतील. तर ती मालिका पार पडल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. इथे पुन्हा एकदा संघाला ३ एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. जानेवारी २०२७ मध्ये लंकन संघ एकदिवसीय मालिकेसाठी भारतात येईल. आणि तिथे भारतीय संघाची एकदिवसीय विश्वचषकाची तयारी पूर्ण होईल. कारण, लगेचच २०२७ ची विश्वचषक स्पर्धा दक्षिण आफ्रिका, झिंबाब्वे आणि नामिबिया इथं सुरू होईल. अशाप्रकारे भारतीय संघ सर्व आयसीसी सदस्य देशांशी मिळून एकूण २७ सामने या कालावधीत खेळणार आहे. २०२७ च्या विश्वचषकात भारताला अपेक्षा असेल ती २०२३ च्या पराभवाचा वचपा काढत ही स्पर्धा जिंकण्याची. (ODI World Cup 2027)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.