पीव्ही सिंधूला कांस्य, तर भारतीय हॉकी संघाची सेमीफायनलमध्ये धडक

टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने कांस्य पदक मिळवले, तर भारतीय पुरुष हॉकी संघाने सेमीफायनलमध्ये जागा पटकावली आहे.

आघाडीची बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने चीनी ताइपेच्या खेळाडू विरुद्ध सेमीफायनलचा सामना गमावत सुवर्णपदकासह रौप्य पदक मिळवण्याची संधीही गमावली, मात्र त्यानंतर तिने बिंगजियाओ हिला पहिल्या सेटमध्ये 13-21 आणि दुसऱ्या सेटमध्ये 15-21 ने नमवत कांस्य पदक पटकावले आहे. तर भारतीय पुरूष हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने ब्रिटनला ३-१ ने पराभूत केले.

सिंधूचे यशस्वी पुनरागमन!

टोकियो स्पर्धेत कांस्य पदक जिंकूण ऑलिम्पिकमध्ये व्यक्तीगत स्पर्धेत दोन पदक जिंकणारी सिंधू पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तर दिग्गज पैलवान सुशील कुमार  नंतर अशी कामगिरी करणारी दुसरी भारतीय ठरली आहे. सिंधूने याआधी 2016 च्या रियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवले होते. त्यानंतर यावर्षी कांस्यपदक मिळवत सिंधूच्या कारकिर्दीत आणखी चारचाँद लागले आहेत. याआधी वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्यपदक पटकावले होते. त्यामुळे भारतासाठी यंदाच्या ऑलिम्पिकमधले हे दुसरे पदक असून बॉक्सर लवलीनानेही किमान कांस्य पदक निश्चित केले आहे. सिंधूने पहिल्या गेममध्ये सुरुवातीला 5-2 ची आघाडी घेत सामन्याची सुरुवात केली. चीनच्या खेळाडूने देखील पुनरागमन करत काही पॉइंट्स घेत बरोबरी साधली. मध्यांतरापर्यंत 11-8 ची आघाडी सिंधूकडे होती. ज्यानंतर तिने तुफान खेळी करत 21-13 च्या फरकाने सेट जिंकत सामन्यात 1-0 ची आघाडी घेतली.

(हेही वाचा : दंतेवाडातील १५ गावे होणार नक्षलमुक्त! महाराष्ट्रातही चालवले जाते ‘ते’ अभियान!)

हॉकी संघ इतिहासाची पुनरावृत्ती करणार!

भारतीय पुरूष हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने ब्रिटनला ३-१ ने पराभूत केलं. भारतीय संघ सुवर्णपदकापासून दोन विजय दूर आहे. जवळपास ४ दशकानंतर भारतीय पुरूष हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून १-७ ने पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केलं आहे. अ गटातील ५ पैकी ४ सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. आता उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटेनला पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना बेल्जियमशी होणार आहे. बेल्जियमने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनला ३-१ अशी धूळ चारत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी हे दोन संघ उपांत्य फेरीत भिडणार आहेत. स्पर्धेत ऑस्ट्रेलियाची कामगिरी उल्लेखनीय आहे. उपांत्यपूर्व फेरीत नेदरलँडशी अटीतटीचा सामना झाला. सामना २-२ ने बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआउटमध्ये निर्णय लागला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here