Paris Olympics 2024 मध्ये सरबज्योत सिंह आणि मनू भाकरने रचला इतिहास! भारताला आणखी एक कांस्य पदक

169
Paris Olympics 2024 मध्ये सरबज्योत सिंह आणि मनू भाकरने रचला इतिहास! भारताला आणखी एक कांस्य पदक
Paris Olympics 2024 मध्ये सरबज्योत सिंह आणि मनू भाकरने रचला इतिहास! भारताला आणखी एक कांस्य पदक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) भारताची नेमबाजपट्टू मनू भाकर (Manu Bhaker) आणि सरबज्योत सिंह (Sarabjot Singh) यांच्या जोडीने इतिहास रचला आहे. 10 मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताने कांस्य पदक जिंकलं आहे. तसेच एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू भाकर पहिली आणि एकमेव भारतीय खेळाडू ठरली आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंह यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दक्षिण कोरियाला पराभूत करताना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं दुसरं पदक जिंकलं आहे. (Paris Olympics 2024)

मनू भाकरचे हे दुसरे ऑलिम्पिक पदक

अंतिम फेरीत, भाकेर आणि सरबज्योत यांनी वोंहो ली आणि ये जिन ओह यांचा 16-10 असा पराभव केला. भारतीय जोडीने एका क्षणी 10-4 ने आघाडी घेतली आणि 10 शॉट्सच्या मालिकेनंतर 14-6 असा मोठा फरक निर्माण केला. कोरियन जोडीने सलग मालिका जिंकून बाउन्स बॅक केलं आणि सामना सुरु ठेवला मात्र सर्व काही अपरिहार्यपणे लांबणीवर टाकलं. 13व्या मालिकेत भारताने कोरियाच्या 18.5 च्या तुलनेत 19.6 गुण मिळवलं आणि पदकावर आपलं नाव कोरलं. 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत भारताला हे पदक मिळाले आहे. मनू भाकरचे हे दुसरे ऑलिम्पिक पदक आहे. (Paris Olympics 2024)

कोण आहे मनू भाकर?
22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. जागतिक नेमबाजीत मनू भाकरनं आतापर्यंत दोन सांघिक पदकं मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेलं आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाचं एक सांघिक सुवर्णपदक मिळालं होतं. (Paris Olympics 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.