Swapnil Kusale Bronze : स्वप्नील कुसाळेला ५० मीटर रायफल शूटिंगमध्ये कांस्य पदक, पंतप्रधानांनी केले अभिनंदन

136
Swapnil Kusale Bronze : स्वप्नील कुसाळेला ५० मीटर रायफल शूटिंगमध्ये कांस्य पदक, पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Swapnil Kusale Bronze : स्वप्नील कुसाळेला ५० मीटर रायफल शूटिंगमध्ये कांस्य पदक, पंतप्रधानांनी केले अभिनंदन

२८ वर्षीय नेमबाज स्वप्निल कुसाळेनं (Swapnil Kusale Bronze) ५० मीटर थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत कमाल करताना ४५१.४ गुण कमावत तिसरा क्रमांक पटकावला. आणि भारताला या ऑलिम्पिकमधलं नेमबाजीतील तिसरं कांस्य मिळवून दिलं. खरंतर स्वप्निल अंतिम फेरीत पोहोचला असला तरी प्रतिस्पर्धी नमबाजांपेक्षा जागतिक क्रमवारीत नवखा होता. अंतिम ८ पैकी केवळ एक नेमबाज त्याच्यापेक्षा कमी होता. असं असताना त्याने अंतिम फेरीत झोपून, गुडघ्यावर बसून आणि उभं राहूनही चांगली कामगिरी केली. थ्री पोझिशनमध्ये आधी झोपून, मग गुडघ्यावर बसून आणि मग उभं राहून अशा प्रत्येकी १५ फैरी स्पर्धक झाडतात. आणि मग बाद फेरीच्या प्रत्येकी २ आणि शेवटी एक फैर झाडायची असते.

झोपून झाडायच्या १५ फैरींमध्ये स्वप्निल ८ स्पर्धकांमध्ये सहावा होता. त्यानंतर गुडघ्यावर बसून झाडलेल्या १५ फैरीत तो पाचवा आला. त्याने खरी झेप घेतली ती उभं राहून झाडायच्या १० फैरींमध्ये तीन पोझिशन पैकी पहिल्या दोन त्या मानाने सोप्या असतात. पण, उभं राहून झाडायच्या फैरीत रायफलला फारसा आधार मिळत नाही. त्यामुळे ही पोझिशन सगळ्यात कठीण असते. आणि इथंच बाकीचे स्पर्धक काहीसे मागे पडत गेले. पण, स्वप्निल पुढे गेला. इथं सातत्याने १० पेक्षा जास्त गुण मिळवत तो अखेर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला. (Swapnil Kusale Bronze)

हेही वाचा- Swapnil Kusale Bronze : ५० मीटर थ्री पोझिशनमध्ये स्वप्निल कुसाळेला कांस्य पदक

स्वप्निलने दडपणाखाली सुरेख कामगिरी करत हे पदक भारताला मिळवून दिलं. ५० मीटर थ्री पोझिशन ही नेमबाजीतील मॅरेथॉन मानली जाते. कारण, जवळ जवळ एक तास अंतिम फेरीच चालते. पण, तंत्रावर विश्वास ठेवत स्वप्निलने चांगली कामगिरी बजावली. उभं राहून झालेल्या दोन सीरिजमध्ये स्वप्निलने ५१.१ आणि ५०.४ गुण मिळवले. चीनचा लि ऊ पहिला आला. (Swapnil Kusale Bronze)

हेही वाचा- Paris Olympic 2024 : स्वप्निल कुसळेचा ५० मीटर थ्री पोझिशनचा अंतिम सामना, भारतीय संघाचं गुरुवारचं वेळापत्रक 

स्वप्निलच्या या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) ट्वीट करत त्याचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान म्हणाले, “स्वप्नील कुसळेची अप्रतिम कामगिरी! #ParisOlympics2024 मध्ये पुरुषांच्या 50m रायफल 3 पोझिशनमध्ये कांस्यपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याची कामगिरी विशेष आहे कारण त्याने उत्तम लवचिकता आणि कौशल्य दाखवले आहे. तसेच या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. प्रत्येक भारतीय आनंदाने भरलेला आहे.” असं ते म्हणाले. (Swapnil Kusale Bronze)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.