सध्या फ्रांस येथे सुरु असलेल्या ऑलिंपिकची स्पर्धा (Olympic Games Paris 2024) नव्या वादात सापडली आहे. बॉक्सिंगच्या स्पर्धेत इटलीची बॉक्सर एंजेला कॅरिनी हीच पराभव झाला. स्पर्धेत तिने स्वतःहून माघार घेतली. कारण तिचा प्रतिस्पर्धी पुरुष होता, त्याच्या एकाच पंचने तिला इतक्या असह्य वेदना झाल्या की, तिने स्वतःहून हार पत्करली. आता हा पुरुष बॉक्सर इमेन खेलीफ हा स्वतःला स्त्री म्हणवत आहे. विशेष म्हणजे ऑलिंपिकच्या आयोजकांनी इमेन खेलीफ याला स्त्री बॉक्सर म्हणून मान्यता दिली आहे. या प्रकरणामुळे जगभरात इमेन खेलीफ याचा विरोध होत आहे. तसेच ऑलिंपिकच्या निर्णयावरही टीका होऊ लागली आहे.
या स्पर्धेत पराभव झालेल्या एंजेला कॅरिनीने प्रतिक्रिया देताना म्हटले की, आतापर्यंत माझ्या जीवनात मी एवढा मोठा प्रहार कधीच अनुभवला नव्हता. देशाशी मी आतापर्यंत प्रामाणिक राहिले आहे; परंतु या प्रसंगी मला माझ्या शारीरिक सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे लागले. या प्रहारामुळे तिच्या नाकाचे अस्थीभंग झाल्याचे सांगितले जात आहे. या घटनेवरून आता आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेला (Olympic Games Paris 2024) विरोधाचा सामना करावा लागत आहे.
या प्रकरणावरून अनेक प्रथितयश लोकांनी ऑलिम्पिकला धारेवर धरले असून ‘इमेन खेलीफ (Eman Khalif) या पुरुषाला महिला बॉक्सिंग शर्यतीमध्ये खेळण्याची अनुमती दिलीच कशी?, असा प्रश्न केला जात आहे. अमेरिकेतील अब्जाधीश इलॉन मस्क यांनी यावर म्हटले की, पुरुष महिलांच्या खेळात सहभागी होऊ शकत नाहीत!
I’m a benefit of the doubt and always assume good faith guy.
However, we are being asked:
A. To NOT believe what we see with our eyes
B. To NOT believe the women when they tell us they took the hardest punches they ever felt
C. To NOT believe multiple tests around XY and… https://t.co/XAi7KE9v8q— @jason (@Jason) August 2, 2024
विशेष म्हणजे जागतिक बॉक्सिंग संघटनेने इमेन खेलीफ याला गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत अपात्र ठरवले होते; परंतु आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने (Olympic Games Paris 2024) मात्र त्याला महिलांच्या विरोधात खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. जागतिक बॉक्सिंग संघटनेने खेळाडूंची निवड करतांना त्यांच्या लिंगाशी संबंधित तपासणीत त्यांच्यात ‘एक्स-एक्स’ (महिला) गुणसूत्र आहेत कि ‘एक्स-वाय’ (पुरुष) गुणसूत्र आहेत, याचा आधार घेतला होता. त्यात इमेन खेलीफ याच्यात ‘एक्स-वाय’ गुणसूत्र असल्याचे आढळले होते.
ऑलिंपिक म्हणते ‘तो’ स्त्रीच!
दुसरीकडे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक संघटनेने (Olympic Games Paris 2024) मात्र यावर खुलासा करताना म्हटले की, खेलीफ याच्या पारपत्रावर तो महिला असल्याचा उल्लेख आहे. तसेच गेल्या वर्षाच्या जागतिक बॉक्सिंग संघटनेच्या निर्णयाचा हवाला देत आमच्यावर टीका केली जात आहे, ते अयोग्य आहे. खेलीफ हा गेल्या अनेक वर्षांपासून विविध खेळांमध्ये महिला म्हणूनच सहभागी होत आला आहे.
Join Our WhatsApp Community