Mission Worldcup : ‘हे’ १५ खेळाडू संघात असतील, तर भारत सहज जिंकू शकतो वर्ल्डकप!

99

टी२० विश्वचषकात पराभव झाल्यावर BCCI ने नव्याने संघ बांधणीला सुरूवात केली आहे. २०२३ मध्ये होणारा विश्वचषक भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या वनडे विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात कोणते खेळाडू असणे आवश्यक आहे. टीम इंडियामधील वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासाठी हा वर्ल्डकप खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यांच्यासाठी आता नाही तर कधीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

( हेही वाचा : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खुशखबर! सुशोभीकरणाच्या कामांना फ्लोरिकल्चरची जोड, काय आहे हा अनोखा उपक्रम )

सध्या भारताची ओपनिंग जोडी फारशी चांगली कामगिरी करत नाहीये अशावेळी पुन्हा एकदा शिखर धवनला संधी दिली जाऊ शकते. तसेच आगामी विश्वचषकासाठी भारताने गोलंदाजीकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे अक्षर पटेल, दीपक हुडा यांसारखे नवे खेळाडू भारतासाठी महत्त्वाचा पर्याय आहेत. तसेच फिरकीपटू म्हणून युझवेंद्र चहलची नेमणूक सर्वात योग्य ठरेल. असे क्रिकेट तज्ज्ञांचे मत आहे.

१५ खेळाडूंच्या यादीत कोणाला स्थान?

  1. रोहित शर्मा ( कर्णधार)
  2. शिखर धवन
  3. विराट कोहली
  4. केएल राहुल/शुबमन गिल (उपकर्णधार)
  5. श्रेयस अय्यर
  6. सूर्यकुमार यादव
  7. ऋषभ पंत ( यष्टीरक्षक)
  8. हार्दिक पंड्या
  9. रविंद्र जडेजा
  10. जसप्रित बुमराह
  11. अर्शदीप सिंग
  12. उमरान मलिक
  13. संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
  14. युझवेंद्र चहल
  15. मोहम्मद शमी

टीम इंडिया ICC ची शेवटची ट्रॉफी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात २०१३ मध्ये जिंकली होती. त्यामुळे आता ICC स्पर्धा जिंकणे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.