महिला खेळाडूंसाठी महिला प्रशिक्षकच नेमावेत; उपसभापती नीलम गोऱ्हे यांची मागणी

जगभरात देशाचे नाव चमकवणार्‍या सुमारे ३० भारतीय महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी त्यांचे वारंवार लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यात बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३० कुस्तीपटूंनी जंतरमंतर मैदानावर १८ जानेवारी २०२३ रोजी निदर्शने देखील सुरू केली आहेत. या पार्श्वभूमीवर अशा घटना भविष्यात पुन्हा पुन्हा घडू नयेत या उद्देशाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र पाठवले आहे.

काय केल्या डॉ. गोऱ्हे यांनी मागण्या?

त्यात क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी केली आहे. या घटनेच्या अनुषंगाने केंद्रीय क्रीडा व राज्याच्या क्रीडा विभागात लैंगिक शोषणाच्या घटना थांबविण्यासाठी विशाखा समिती स्थापन करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, महिला खेळाडूसाठी प्रत्येक ठिकाणी महिला प्रशिक्षकच नेमावेत, याबाबत दक्षता घेण्याबाबत निर्देशित करावे. प्रत्येक राज्याच्या स्तरावर एक समिती स्थापन करून क्रीडा प्रकारानुसार उपसमित्या स्थापन करून असे प्रकार राज्यात होणार नाहीत याबाबत खबरदारी घ्यावी इत्यादी मागण्या केल्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही या सर्व सूचना लागू व्हाव्यात, अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.

(हेही वाचा पुण्यातील दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता कमी)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here