P T Usha : ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये पी टी उषाला कार्यकारिणी सदस्यांचा उपद्रव

ऑलिम्पिक असोसिएशनचे कार्यकारी अधिकारी नेमण्याची प्रक्रिया स्थगित

131
P T Usha : ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये पी टी उषाला कार्यकारिणी सदस्यांचा उपद्रव
P T Usha : ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये पी टी उषाला कार्यकारिणी सदस्यांचा उपद्रव
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (Indian Olympic Association) अध्यक्ष पी टी उषा यांना कार्यकारिणी सदस्यांचा होत असलेला विरोध आता वाढतच चालला आहे. गेल्याच आठवड्यात उपाध्यक्ष सहदेव यादव (Sahdev Yadav) यांनी कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देताना उषा यांच्यावरच मानहानीचा दावा ठोकण्याची भाषा केली. त्यानंतर आता मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्याच्या प्रक्रियेतही अडथळे आणले जात आहेत. सध्याचे सीईओ रघुराम अय्यर (CEO Raghuram Iyer) यांना कार्यकारिणीतील बहुतांश सदस्यांचा विरोध आहे. आणि त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय ५ जानेवारीलाच झाला आहे. पण, अय्यर यांनी पदावरून दूर व्हायला चक्क नकार दिला आहे. आणि त्यावरून कार्यकारिणीत दोन तट पडले असून या आठवड्यात झालेल्या बैठकीत त्याचे तीव्र पडसाद उमटले.  (P T Usha)

(हेही वाचा –M. S. Dhoni : महेंद्र सिंग धोनीला हेलिकॉप्टर शॉट नेमका कुणी शिकवला? )

सीईओचा मुद्दा अखेर जैसे थे राहिला. या बैठकीनंतर पी टी उषा (P T Usha) संतापल्या होत्या. ‘आता जे भांडण चाललंय त्याचा परिणाम आणि पडसाद आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीत उमटणार आहेत. आपल्याला ऑलिम्पिक आयोजनासाठी अर्ज करायचाय. आणि अशावेळी आंतरराष्ट्रीय समितीकडे अंतर्गत भांडणं पोहोचली तर त्याचा काय परिणाम होईल? सीईओ नेमण्याची प्रक्रिया अडीच वर्ष सुरू होती. आणि आता अचानक झालेली प्रक्रिया रद्द करून या लोकांना नव्याने डाव मांडायचा आहे. हे योग्य आहे का?’ असा सवालच उषा यांनी पत्रकारांसमोर विचारला.

इतकंच नाही तर जोपर्यंत ऑलिम्पिक असोसिएशनमधील व्यवहार स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत प्रयत्न करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘मी हार मानणाऱ्यांपैकी नाही. मी हे प्रकरण आंतरराष्ट्रीय समितीकडे घेऊन जाईन. आणि जोपर्यंत भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन स्वच्छ होत नाही, तोपर्यंत मी इथून हटणार नाही,’ असं पी टी उषा यांनी निक्षून सांगितलं.

(हेही वाचा – पाकिस्तानी चित्रपट ‘The Legend of Maula Jatt’ भारतात प्रदर्शित होणार नाही! जाणुन घ्या काय आहे कारण?)

उषांनी उघडपणे हा राग व्यक्त केलेला असतानाही कार्यकारिणीतील १० सदस्यांनी बैठकीनंतर आपली बाजूही प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली. आणि सीईओच्या नेमणुकीसाठी नवीन प्रक्रिया सुरू करण्यावरच त्यांनी जोर दिला. त्यामुळे हे प्रकरण इथंच न संपता आणखी चिघळणार हे स्पष्ट आहे. (P T Usha)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.