P. T. Usha : खजिनदार सहदेव यादव यांची पी. टी. उषा यांना मानहानीच्या दाव्याची धमकी

P. T. Usha : ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्ष म्हणून उषा यांनी सहदेव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. 

125
P. T. Usha : खजिनदार सहदेव यादव यांची पी. टी. उषा यांना मानहानीच्या दाव्याची धमकी
  • ऋजुता लुकतुके

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्ष पी. टी. उषा (P. T. Usha) आणि खजिनदार सहदेव यादव यांच्यातील वाद आता न्यायालयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला दिसतोय. यादव सध्या उषा यांच्या विरोधात आक्रमक असून त्यांनी कोर्टात मानहानीचा दावा ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. या महिन्यात १० सप्टेंबरला अध्यक्ष पी. टी. उषा यांनी सहदेव यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याचाच राग सहदेव यांना आला आहे. ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीत राहण्यासाठी सहदेव यादव पात्र आहे का, असा सवाल उभा करणारी एक तक्रार पी. टी. उषा यांच्याकडे आली होती. त्यानंतरच उषा यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली. सहदेव यादव हे भारतीय भारोत्तोलन असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.

(हेही वाचा – Ashok Chaudhary यांच्या पोस्टमुळे नितीश कुमार अस्वस्थ; पक्षांतर्गत नाराजी उघड)

आणि पी. टी. उषा (P. T. Usha) यांना आलेल्या एका निनावी पत्रात सहदेव आणि आणखी काही अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारने आखून दिलेल्या नियमांचं पालन न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. क्रीडा कार्यकारिणीत सहभागासाठी केंद्रसरकारने वयाची मर्यादा घालून दिली आहे. तसंच किती काळ एका पदावर राहायचं याचेही नियम आखून दिले आहेत. पण, अनेकदा पदाधिकारी या नियमांचं उल्लंधन करतात. या नियमांनुसार, एखादी व्यक्ती कमाल १२ वर्षं एकाच क्रीडा नियामक संस्थेत राहू शकते. पण, यादव आधी ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव होते आणि आता खजिनदार आहेत. त्यांचं कार्यकारिणीतील हे पंधरावं वर्ष आहे. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पण, त्यामुळे सहदेव यादव चिडले आहेत.

(हेही वाचा – बदलापुरात अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांचा विरोध; Akshay Shinde चा मृतदेह घरी आणणार का? वाचा सविस्तर…)

‘कोणीतरी खोडसाळपणा करून लिहिलेल्या चिठीवरून तुम्ही ही कारवाई करावी हे दुर्दैवी आहे. शिवाय ते पत्र राजकीय हेतूंनी प्रेरित आहे हे दिसत असूनही माझ्यावर नोटीस बजावण्यात आली आहे. ऑलिम्पिक असोसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झालेली असताना माझ्यावर असे आरोप व्हावेत हे दुर्दैवीच आहे. आता मलाही कायदेशीर पावलं उचलण्यावाचून पर्याय नाही,’ असं सहदेव यांनी म्हटलं आहे. हे प्रकरण आता येणारे काही दिवस गाजणार हे नक्की आहे. त्यामुळे ऑलिम्पिक असोसिएशनमध्ये दोन तट पडण्याचीही शक्यता आहे. उषा (P. T. Usha) यांनी बजावलेली कारणे दाखवा नोटीस क्रीडामंत्री मनसुख मांडवीय आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीलाही पाठवण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.