P.T Usha : पी.टी उषा राष्ट्रकूल खेळांच्या फेडरेशनची निवडणूक लढणार 

पी टी उषा आता खेळाच्या प्रशासनातही रस घेऊ लागल्या आहेत. राष्ट्रकूल खेळ फेडरेशनच्या निवडणुकीत उपाध्यक्ष पदासाठी त्यांनी अर्ज केला आहे. 

206
P.T Usha : पी.टी उषा राष्ट्रकूल खेळांच्या फेडरेशनची निवडणूक लढणार 
P.T Usha : पी.टी उषा राष्ट्रकूल खेळांच्या फेडरेशनची निवडणूक लढणार 

ऋजुता लुकतुके

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष आणि माजी शंभर मीटर ॲथलीट पी टी उषा यांनी राष्टक्रूल खेळ फेडरेशनच्या निवडणुकीला उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. उपाध्यक्ष पदासाठी त्यांनी अर्ज केला आहे. फेडरेशनच्या आगामी निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रादेशिक उपाध्यक्ष तसंच क्रीडा समितीचे सदस्यांची निवड होणार आहे. त्यासाठीची नावं जाहीर झाली आहेत.

यात उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत पी टी उषा यांच्या बरोबर कूक आयलंड्सचे ह्यू ग्रॅहम, दक्षिण आफ्रिकेचे बॅरी हेंन्रिक्स, बार्बाडोसच्या सँड्रा ऑसबॉर्न, कॅनडाचे रिचर्ड पावर, स्कॉटलंडचे इयन रिड आणि युगांडाचे डोनाल्ड रुकरे हे प्रशासकीय लोक शर्यंतीत आहेत. पी टी उषा यांची डिसेंबर २०२२ मध्ये भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. राष्ट्रकूल खेळ फेडरेशनच्या अध्यक्षपदासाठी ख्रिस जेनकिन्स आणि केरिन स्मिथ शर्यतीत आहेत. राष्ट्रकूल क्रीडा समितीसाठीही पंधराच्या वर सदस्य दावेदार आहेत.

येत्या १४ आणि १५ नोव्हेंबरला राष्ट्रकूल खेळ फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. त्या दरम्यानच पहिल्या दिवशी क्रीडा समिती आणि प्रादेशिक उपाध्यक्षांची निवड होईल. आणि दुसऱ्या दिवशी फेडरेशनचे नवीन अध्यक्ष आणि तीन उपाध्यक्षांची निवड होईल.

(हेही वाचा-Tomato Prices : काही आठवड्यांत टोमॅटोच्या किमती ३०० प्रती किलोवरून १५ रुपयांवर 

राष्ट्रकूल क्रीडा संघटना सध्या आर्थिक संकटांशी झुंजतेय. अलीकडेच व्हिक्टोरिया शहराने आपल्याला मिळालेलं यजमान पद आर्थिक कारणांसाठी सोडलं. आणि त्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियातील आणखी एका शहराने स्पर्धा भरवण्यात असमर्थता दाखवली होती. अशावेळी भारत ही उगवती अर्थव्यवस्था आहे. आणि भारताने स्पर्धेच्या आयोजनात अलीकडे रस दाखवला आहे. त्यामुळे स्पर्धेच्या भवितव्यात सध्या भारत महत्त्वाची भूमिका बजावेल असं दिसतंय.

यापूर्वीच्या राष्ट्रकूल स्पर्धा २०२२ मध्ये इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरात झाल्या होत्या. पण, पुढच्या २०२६ च्या स्पर्धा आर्थिक कारणांमुळे नेमक्या कुठे होतील हे ठरलेलं नाही. तो निर्णयही आगामी सर्वसाधारण सभेत होऊ शकतो.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.