P. V. Sindhu Injury Update : दुखापतग्रस्त सिंधू पुढील वर्षीच परतणार कोर्टवर, तिची क्रमवारी सुरक्षित 

गुडघ्याच्या दुखापतीमुळे सध्या कोर्टबाहेर असलेली सिंधू कदाचित आणखी दोन महिने बाहेरच असेल. बॅडमिंटन फेडरेशनकडून तिची क्रमवारी सुरक्षित ठेवण्यात आली आहे

67
P. V. Sindhu Injury Update : दुखापतग्रस्त सिंधू पुढील वर्षीच परतणार कोर्टवर, तिची क्रमवारी सुरक्षित 
P. V. Sindhu Injury Update : दुखापतग्रस्त सिंधू पुढील वर्षीच परतणार कोर्टवर, तिची क्रमवारी सुरक्षित 

ऋजुता लुकतुके

गेल्या महिन्यात फ्रेंच ओपन सुपरसीरिज खेळताना पी व्ही सिंधूने (P. V. Sindhu Injury Update) गुडघ्याला दुखापत झाल्याची दु:खद बातमी तिच्या चाहत्यांना दिली होती. या दुखापतीतून सावरण्यासाठी तिला आणखी किमान दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे पुढील वर्षीच्या सुरुवातीलाच ती कोर्टवर पुन्हा परतेल असं दिसतंय. दर मंगळवापी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनकडून जागतिक क्रमवारी जाहीर करण्यात येते. यात सिंधूची क्रमवारी सुरक्षित ठेवण्यात आली आहे.

सुरक्षित क्रमवारी म्हणजे काय? 

नवीन क्रमवारी जाहीर झाली यात सिंधूच्या नावापुढे सेक्युअर्ड असं लिहिलं आहे. खेळाडू दुखापत किंवा इतर तंदुरुस्तीच्या कारणांमुळे सातत्याने स्पर्धा खेळू शकणार नसेल, तर क्रमवारीतील स्थान सुरक्षित करून घेण्याची सोय बॅडमिंटन फेडरेशनने करुन दिली आहे. पण, खेळाडूचा कोर्ट बाहेर असण्याचा काळ किमान तीन महिने ते कमाल एक वर्षं असावा असा निकष त्यासाठी आहे.

(हेही वाचा-Indian Army: भारतीय लष्कर चिता आणि चेतक विमान बदलणार, जाणून घ्या कारण

खेळाडूच्या विनंतीवरून असं क्रमवारीतील स्थान सुरक्षित ठेवलं जाऊ शकतं. त्यामुळे सिंधूनेच ही विनंती केली हे उघड आहे. आणि किमान तीन महिने ती खेळू शकणार नाहीए.

यापूर्वी ३१ ऑक्टोबरला सिंधूने ट्विटकरून आपल्या दुखापतीविषयी माहिती दिली होती.

किमान तीन महिने पकडले तरी सिंधू फेब्रुवारीच्या आत कोर्टवर परतण्याची शक्यता कमीच आहे. अर्थात, तिची प्रकृती सुधारली तर ती आधीही येऊ शकते. क्रमवारी सुरक्षित ठेवल्यामुळे ती खेळत नसेल त्या काळात ती रेटिंग गुण गमावणार नाही. आणि याचा फायदा तिला पुनरागमन करताना होईल. तेव्हा ती याच रेटिंगवर खेळायला सुरू करू शकेल.

पुढचं वर्षं हे ऑलिम्पिक वर्ष आहे. आणि अशावेळी सिंधूला या गोष्टीचा फायदा मिळेल. अर्थात, ऑलिम्पिक तयारीला या दुखापतीमुळे मोठा फटका बसला आहे. गुडघ्याच्या दुखापतीपूर्वी युरोपीयन सर्किटवर सिंधूचा खेळ चांगला होत होता. आणि दोन स्पर्धांमध्ये तिने उपान्त्य फेरीतही मजल मारली होती.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.