P V Sindhu : पी व्ही सिंधू ऑलिम्पिक सुवर्णासाठी जीवतोड प्रयत्न करणार

P V Sindhu : ऑलिम्पिक रौप्य, कांस्य नावावर असलेली सिंधू यंदा सुवर्णासाठी खेळणार आहे. 

99
P V Sindhu : पी व्ही सिंधू ऑलिम्पिक सुवर्णासाठी जीवतोड प्रयत्न करणार
  • ऋजुता लुकतुके

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी सुवर्ण पदक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. सुवर्णासाठी जीवतोडून मेहनत घेत असल्यांच तिने म्हटलं आहे. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिने रौप्य जिकलं. ४ वर्षांनी टोकयोमध्ये कांस्य पदक जिंकलं आहे. वैयक्तिक दोन ऑलिम्पिक पदकं जिंकणारी सुशील कुमार नंतरची ती फक्त दुसरी खेळाडू आहे. आता सिंधूला सुवर्ण पदकापर्यंत पोहोचायचं आहे. (P V Sindhu)

जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत तिने सुवर्ण पदकासाठी करत असलेल्या तयारीविषयी माहिती दिली आहे. ‘तिसरं आणि ते सुद्धा पिवळं पदक जिंकण्याच्या प्रेरणेनेच मी पॅरिसमध्ये खेळणार आहे. ऑलिम्पिक म्हटलं की, मी २०० टक्के प्रयत्न करते. आणि आताही तेच करतेय. ऑलिम्पिक प्रवास माझी ओळख निर्माण करणारा ठरला आहे. आताही मला सर्वस्व त्यासाठी द्यायचंय,’ असं सिंधू या मुलाखतीत म्हणते. (P V Sindhu)

(हेही वाचा – Microsoft Windows Crash : मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक समस्या, जगभरातील विमान उड्डाणवर परिणाम)

ही पदके आहेत पी व्ही सिंधूच्या नावावर 

पण, प्रत्येक ऑलिम्पिक ही नवीन सुरुवात असते याची कल्पना तिला आहे. ‘प्रकाश सरांचं मार्गदर्शन मला मिळतंय. आम्ही सगळे मिळून तयारी नेमकी आणि सखोल कशी होईल, याचा विचार करत आहोत. ऑलिम्पिकची स्पर्धा मोठी असते. तिथे मला फाजील आत्मविश्वास बाळगायचा नाही. तयारी चांगली व्हायला हवी यासाठी मी १०० टक्के देत आहे,’ असं सिंधू म्हणते. (P V Sindhu)

पी व्ही सिंधू आतापर्यंतची भारताची सर्वात यशस्वी बॅडमिंटनपटू आहे आणि तिच्या नावावर जागतिक अजिंक्यपदाबरोबरच राष्ट्रकूल सुवर्णही आहे. अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदकाव्यतिरिक्त तिने आणखी ४ पदकं मिळवली आहेत. तर ऑलिम्पिकमध्येही रौप्य आणि कांस्य तिच्या नावावर आहे. (P V Sindhu)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.