- ऋजुता लुकतुके
एका चेंडूत सात धावा निघण्यासाठी साधारणपणे फलंदाजाने एक षटकार खेचला पाहिजे आणि पंचांनी तो नो बॉल दिला असला पाहिजे. म्हणजे ती एक धावही जमा होते. पण, पाकिस्तानने आपल्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाने ७ धावा बहाल केल्या. (Pak Tour of Aus)
पाकिस्तान क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. तिथे पहिल्या कसोटी पूर्वीचा सराव सामना पाक संघ खेळतोय तो पंतप्रधान इलेव्हन या संघाबरोबर कॅनबेराच्या मनुका ओव्हल इथं. या सामन्यात शनिवारी एक मजेशीर प्रसंग पाहायला मिळाला. सॅम रॅनशो या फलंदाजाला तेव्हा अर्धशतकासाठी ३ धावा हव्या होत्या आणि षटकातल्या शेवटच्या चेंडूवर त्याने चक्क सात धावा काढल्या. पण, यात एकही षटकार नव्हता की चौकार. (Pak Tour of Aus)
पाक ऑफ स्पिनर अबरार अहमदला कव्हर्सच्या दिशेनं फटकावल्यावर चेंडू आधी मिर हमझाला चकवून गेला आणि पुढे काय झालं ते तुम्हीच पाहा. (Pak Tour of Aus)
You don’t see this every day! Matthew Renshaw brings up his half-century … with a seven! #PMXIvPAK pic.twitter.com/0Fx1Va00ZE
— cricket.com.au (@cricketcomau) December 8, 2023
खरंतर कव्हर्सला हमझाने चेंडू सूर मारून छान अडवला आणि तो पटकन नॉन स्ट्रायकर एंडला बाबर आझमकडे पाठवलाही. पण, बाबरने धावचीतची संधी साधण्यासाठी त्वेषाने चेंडू स्ट्राटकर एंडला पाठवला आणि इथं शान मसूद आणि यष्टीरक्षक सर्फराज अहमद यांच्या मधून चेंडू पार सीमारेषेवर गेला. (Pak Tour of Aus)
(हेही वाचा – नव्या वर्षात Coastal Road चा पहिला टप्पा होणार सुरु)
मधल्या काळात फलंदाज रॅमशॉने तीन धावा काढलेल्या होत्या. रॅमशॉने दरम्यान आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. सामन्याबद्दल बोलायचं झालं तर पंतप्रधान इलेव्हन संघाने दिवसअखेर ३६४ धावा केल्या आहेत. पाकिस्तानने पहिली फलंदाजी करत ४०० धावा केल्या होत्या. पाकिस्तानचा नवीन कर्णधार शान मसूदने २०१ धावा केल्या. (Pak Tour of Aus)
ऑस्ट्रेलियाकडून रेनशॉने १३६ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून रेनशॉने १४ कसोटी खेळल्या आहेत. पण, मागची ७ वर्ष तो संघात स्थान बळकट करू शकलेला नाही. आताही त्याला ऑस्ट्रेलियन संघात परत येण्याची संधी आहे. (Pak Tour of Aus)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community