Pak vs Eng : इंग्लंड विरुद्ध ३०० धावा केल्या तर पाकला त्यांना ‘इतक्या’ धावांमध्ये गुंडाळावं लागेल

पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीतला प्रवेश जवळ जवळ अशक्य आहे. पण, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पाकसाठी नेमकं उपांत्य फेरीचं गणित काय आहे समजून घेऊया…

135
Pak vs Eng : इंग्लंड विरुद्ध ३०० धावा केल्या तर पाकला त्यांना ‘इतक्या’ धावांमध्ये गुंडाळावं लागेल
Pak vs Eng : इंग्लंड विरुद्ध ३०० धावा केल्या तर पाकला त्यांना ‘इतक्या’ धावांमध्ये गुंडाळावं लागेल
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीतला प्रवेश जवळ जवळ अशक्य आहे. पण, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पाकसाठी नेमकं उपांत्य फेरीचं गणित काय आहे समजून घेऊया… (Pak vs Eng)

विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी न्यूझीलंडने श्रीलंकेवर २६.४ षटकं राखून विजय मिळवला तेव्हाच पाकिस्तानचं काम बरंच कठीण झालं. कारण, आता पाक तसंच अफगाण संघांना त्यांचे प्रतिस्पर्धी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेवर खूप मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. सरस रनरेट हा एकमेव निकष या दोन संघांना आता उपांत्य फेरीचे दरवाजे उघडू शकतो. (Pak vs Eng)

शनिवारी पाकिस्तानची लढत इंग्लंडशी आहे. त्यांच्यासाठी उपांत्य फेरीचं गणित नेमकं काय आहे ते बघूया… (Pak vs Eng)

पाकिस्तानचा संघ ८ सामन्यांपैकी ४ सामने जिंकून ८ गुणांवर आहे. गुणतालिकेत त्यांचा पाचवा क्रमांक आहे. न्यूझीलंडच्या वर जायचं असेल तर त्यांना इंग्लंडविरुद्धचा शेवटचा सामना २८७ किंवा त्यापेक्षा जास्त फरकाने जिंकावा लागणार आहे. आणि दुसरी फलंदाजी असेल तर ४७ षटकं राखून त्यांना विजय मिळवावा लागेल. (Pak vs Eng)

हे गणित इतकं कठीण असल्यामुळेच भारत विरुद्ध न्यूझीलंड अशा उपांत्य फेरीच्या लढतीचीच शक्यता जास्त आहे. अफगाणिस्तानचा रनरेट तर सध्या उणे आहे. त्यामुळे त्यांचं आव्हान संपल्यात जमा आहे. (Pak vs Eng)

(हेही वाचा – Davis Cup Ind vs Pak Tie : पाकिस्तानमध्ये जाऊन डेव्हिस कप सामना खेळण्याचे टेनिस फेडरेशनचे भारताला निर्देश?)

दुसरा उपान्त्य सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान १६ नोव्हेंबरला कोलकात्यात ईडन गार्डन्सवर होणार आहे. पाकचा कर्णधार बाबर आझमने मात्र इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी संघाचे हौसले बुलंद असल्याचं म्हटलंय. फखर झनान आणि महम्मद रिझवान धुवाधार खेळले तर पाकला मोठा विजयही शक्य आहे, असं पाकला वाटतंय. (Pak vs Eng)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.