
-
ऋजुता लुकतुके
भारत, ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे कसोटीप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेतही दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान असा बॉक्सिंग डे सामना सुरू आहे. आणि या कसोटीत आफ्रिकेच्या नवख्या कॉर्बिन बॉशने कसोटी कारकीर्दीच्या पहिल्याच चेंडूवर बळी मिळवण्याचा विक्रम केला. कसोटीच्या पहिल्या दिवशी पंधराव्या षटकात बॉश गोलंदाजीसाठी आला. आणि त्याने पहिल्याच चेंडूवर शान मसूदला बाद केलं. शान मसूद आणि साईम अयूब यांनी तोपर्यंत पाकिस्तानला स्थिर सुरुवात करून दिली होती. पण, बॉशच्या या चेंडूवर मसूद चकला. आणि उजव्या यष्टीवर टाकलेला चेंडू खेळण्याच्या नादात गलीत झेल उडाला. (Pak vs SA, Centurion Test)
(हेही वाचा- चित्रपट चित्रिकरणाच्या सर्व अनुमतींसाठी एक खिडकी योजना सुरु करा; Ashish Shelar यांचे निर्देश)
विशेष म्हणजे या कामगिरीसह आंतरराष्ट्रीय कारकीर्दीच्या पहिल्या चेंडूवर बळी मिळवणारा बॉश जगातील १५ वा खेळाडू ठरला आहे. तर दक्षिण आफ्रिकेकडून अशी कामगिरी करणारा तो पाचवा गोलंदाज आहे. विशेष म्हणजे २०२४ मध्ये क्रिकेटने अशा तीन घटना पाहिल्या आहेत. त्यादृष्टीने २०२४ हे वर्षंही ऐतिहासिक आहे. जानेवारी महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेत शेमार जोसेफने स्टिव्ह स्मिथला आपल्या पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं. तर त्याच महिन्यात शेपो मोरेकीने डेव्हिड कॉनवेला आपल्या पहिल्याच चेंडूवर बाद केलं होतं. (Pak vs SA, Centurion Test)
दक्षिण आफ्रिकेकडून कारकीर्दीच्या पहिल्या चेंडूवर बळी मिळवणारे गोलंदाज,
बर्ट वोल्हर वि. इंग्लंड, जोहानसबर्ग (१९०६)
डेन पिट वि. झिंबाब्वे, हरारे (२०१४)
हार्डस फिलियन वि. इंग्लंड, जोहानसबर्ग (२०१६)
शेपो मोरेकी वि. न्यूझीलंड, माऊंट मॉगोनी (२०२४)
कॉर्बिन बॉश वि. पाकिस्तान, सेंच्युरियन (२०२४)
बॉशच्या या बळीमुळे पाकिस्तानची स्थिरावलेली सलामीची जोडी फुटली. आणि त्यानंतर थोड्याच वेळात त्यांची अवस्था ४ बाद ५४ अशी झाली. कामरान गुलामने ५४ धावा करत पाक डाव सावरला. आणि त्याला मोहम्मद रिझवानने २८ धावा करत चांगली साथ दिली. पाकिस्तानचा अख्खा संघ २११ धावांत बाद झाला. आणि यात कॉर्बिन बॉशचं योगदान होतं ६३ धावांत ४ बळींचं. त्यानंतर आफ्रिकन डावाची सुरुवातही चांगली झाली नाही. दिवसअखेर आफ्रिकन संघाने ३ बाद ८२ धावा केल्या आहेत. एडन मार्करम ४७ धावांवर नाबाद आहे. (Pak vs SA, Centurion Test)
(हेही वाचा- Mumbai Local Train Update: 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या विशेष लोकल धावणार)
ही कसोटी जिंकून आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची आफ्रिकन संघाला संधी आहे. तर पाकिस्तानने ही कसोटी जिंकल्यास भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका बरोबरीत सोडवूनही अंतिम फेरीची आशा धरता येईल. (Pak vs SA, Centurion Test)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community