बायको भारतीय म्हणून ओकली गरळ, हरलेल्या पाकड्यांची जीभ घसरली

दुबईत टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. गुरुवारी फायलमध्ये धडक मारण्यासाठी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये सामना रंगला होता. पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल असं वाटत असताना, ऑस्टेलियाच्या मॅथ्यू वेडनं झंझावाती फलंदाजी करत, आपल्या संघासाठी प्रतिस्पर्धी संघातून विजय खेचून आणला. या निर्णायक मॅचमध्ये वेडचा विकेट महत्त्वाचा असताना, हसन अलीने त्याचा कॅच सोडला. हा कॅच सोडल्याने पाकिस्तान संघ हरल्याचं पाकिस्तानच्या चाहत्यांना वाटतं आहे. त्यामुळे आता हसन अली नेटक-यांच्या रडारवर आला आहे. पण, नुसतचं ट्रोल करतील तर ते पाकिस्तानी कुठचे. हसन अलीला ट्रोल करताना लोकांची पातळी इतकी घसरली की, त्यांनी हसनच्या भारतीय बायकोवर घाणेरड्या शब्दांत चिखलफेक केली.

बायको भारतीय म्हणून ओकली गरळ

पाकिस्तानी क्रिकेटर हसन अलीची बायको सामिया आरझू भारतीय आहे. ती भारतीय असल्याने नेटक-यांकडून सामियालाही ट्रोल करण्यात आलं. या दोघांच्याही इन्स्टाग्राम अकांऊंटवर जाऊन गरळ ओकण्यात आली आहे. त्यातल्या काही कमेंट्स खाली दिल्या आहेत.

शमीलाही केलं होतं ट्रोलं

भारत आणि पाकिस्तानच्या मॅचमध्ये जेव्हा भारताला पराभवाचा सामना करावा लागला, तेव्हा मोहम्मद शमीला सुद्धा मुसलमान असल्याने ट्रोल करण्यात आलं होत. त्यावेळी मात्र, भारतीय संघातील माजी आणि आजी खेळाडू त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. पण, हसन अलीच्या बाबतीत मात्र असं घडताना दिसत नाही. पण भारतीय क्रिकेटप्रेमींनी हसन अलीला पाठिंबा देणा-या पोस्ट शेअर केल्या आहेत.

(हेही वाचा: उधळलेली मुक्ताफळं कंगनाला पडली महागात, ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा संताप )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here