Pakistan Cricket News : चॅम्पियन्स करंडकातून ३ अब्ज रुपयांची कमाई झाल्याचा पाक मंडळाचा दावा

Pakistan Cricket News : पाक क्रिकेट मंडळाने स्पर्धेच्या आयोजनाचा लेखी अहवाल सादर केला आहे.

69
Pakistan Cricket News : चॅम्पियन्स करंडकातून ३ अब्ज रुपयांची कमाई झाल्याचा पाक मंडळाचा दावा
  • ऋजुता लुकतुके

मार्च महिन्यात पाकिस्तान आणि दुबईत संयुक्तपणे पार पडलेल्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेतून पाक क्रिकेट मंडळाला ३ अब्ज रुपये मिळाल्याचा दावा मंडळाने लेखी अहवालात केला आहे. देशभरात सध्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघाच्या खालावलेल्या कामगिरीची चर्चा होत आहे. चॅम्पियन्स करंडकात पाक संघ साखळीतच एकही सामना न जिंकता गारद झाला. तर त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतही संघाला एकमेव सामना जिंकता आला. कामगिरीची चर्चा झडत असतानाच पाक मंडळाने प्रशासकीय आणि कामकाजाच्या बाबतीत आपण चोख असल्याचा दावा आपल्या अहवालातून केला आहे. (Pakistan Cricket News)

पाक बोर्डाला सुरुवातीला फक्त २ अब्ज रुपये इतक्या कमाईची अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात महसूल वाढला असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ‘चॅम्पियन्स करंडकाचं आयोजन हे पूर्णत: आयसीसीने केलं. पण, पाक मंडळाने कुठेही अतिरिक्त पैसा खर्च करणे किंवा व्यवस्थापनात गलथानपणा केला नाही. सध्या ३ अब्जाचा महसूल दिसत असला तरी निश्चित आकडे आयसीसीचं ऑडिट पूर्ण झाल्यावर कळतील,’ असं या अहवालात म्हटलं आहे. (Pakistan Cricket News)

(हेही वाचा – जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा सुनावताना Terrorist हसत होते; बॉम्बस्फोटात ७१ जणांचा झालेला मृत्यू)

चॅम्पियन्स करंडकापूर्वी पाकिस्तानने लाहोर, कराची आणि रावळपिंडी इथं मैदानांच्या नुतनीकरणाची मोहीम सुरू केली आहे. हे काम २०२६ पर्यंत चालणार आहे. या नुतनीकरणाच्या कामासाठी १८ अब्ज रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं पाकिस्तान क्रिकेट मंडळाने म्हटलं आहे. मे महिन्यापर्यंत पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीग ही टी-२० स्पर्धा होणार आहे. ती पार पडल्यावर नुतनीकरणाचा दुसरा टप्पा सुरू होईल, असं पाक मंडळाने स्पष्ट केलं आहे. नुतनीकरणाचं काम ठरलेल्या तरतुदीनुसार सुरू आहे, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. (Pakistan Cricket News)

त्याचबरोबर पाक मंडळाने संघाच्या ढासळत्या कामगिरीचा उल्लेखही या अहवालात केला आहे. ‘मुख्य खेळाडूंना झालेल्या दुखापती आणि खेळपट्ट्या आणि वातावरणात सतत होणारे बदल यामुळे संघाची कामगिरी खालावली आहे. पाकिस्तान, न्यूझीलंड, इंग्लंड अशा वेगवेगळ्या वातावरणाशी जुळवून घेणं खेळाडूंना कठीण जात आहे. तर सर्व खेळाडू निवडीसाठी उपलब्ध नसल्यामुळे संघाची रणनीती आणि संतुलन बिघडलं आहे,’ असं निरीक्षण या अहवालात नोंदवलं आहे. (Pakistan Cricket News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.