-
ऋजुता लुकतुके
पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या काहीच धड सुरू नाहीए. चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy) पाकचा संघ साखळीतच गारद झाला. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) घरच्या मैदानावर झालेली टी-२० मालिका त्यांनी १-४ ने गमावली. आणि पाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही त्यांच्या पदरी ०-३ असा मोठा पराभव आला. त्याचवेळी आयसीसीकडूनही (ICC) पाक संघावर १० दिवसांत तिसऱ्यांदा कारवाई झाली आहे. विशेष म्हणजे तीनही वेळा चूक एकच होती. अलीकडे षटकांची गती न राखल्यास आयसीसीची (ICC) करडी नजर असते. आणि पाकिस्तानने ही चूक तिसऱ्यांदा केली आहे. पाक संघाचं ५ टक्के मानधन त्यामुळे पुन्हा एकदा कापण्यात आलं आहे. (Pakistan Cricket News)
(हेही वाचा – Political Party Funding : भाजपा, काँग्रेस, आप या राजकीय पक्षांना कोण देतं निधी? कुठल्या पक्षाला मिळाला सर्वाधिक निधी?)
‘पाहुण्या पाक संघावर सलग तिसऱ्या सामन्यात षटकांची गती न राखल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सामनाधिकारी जेफ क्रो यांनी केलेल्या चौकशीत अतिरिक्त वेळ गृहित धरल्यानंतरही पाक संघाने निर्धारित वेळेत एक षटक कमी टाकलं, असं स्पष्ट झालं आहे,’ असं आयसीसीने (ICC) आपल्या पत्रकात म्हटलं आहे. मैदानावरील पंच ख्रिस पॉवेल आणि पॉल रायफल यांनी सामन्यानंतर पाक संघावर तसा दावा केला होता. तिसरे पंच मायकेल गॉ (Michael Gough) आणि चौथे पंच वेन नाईट्स यांनीही या पाकचा खेळ धिमा असल्याचाच निर्वाळा दिला. (Pakistan Cricket News)
पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) पहिली फलंदाजी करताना ८ बाद २६४ धावा केल्या होत्या. मायकेल ब्रेसवेल आणि रिस मारियो यांनी अर्धशतकं ठोकली. तर बेन स्पिअर्सने सलग दुसऱ्या सामन्यांत ५ बळी घेत पाकच्या धावसंख्येला खिळ धातली. पाकचा संघ २२१ धावांत बाद झाला. आणि त्यांचा ४२ धावांनी पराभव झाला. (Pakistan Cricket News)
या सामन्यात पुन्हा एकदा पाकच्या खेळाडूवर प्रेक्षकाकडून हल्ला झाला. सुरक्षा रक्षकांनी परिस्थिती आटोक्यात आणली असली तरी पाकचा खेळाडू खुशदील शाह या घुसखोरीमुळे चिडला होता. आणि तो प्रेक्षकाच्या दिशेनं चालूनही गेला होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community