ICC Men’s World Cup 2023 साठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ अखेर भारतात आला. या आधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आम्ही भारतात क्रिकेटचा सामना खेळणार नाही, असे म्हटले होते, यामागे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बिघडलेले संबंध हे कारण आहे, त्यावर भारताने काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती, अखेर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्वतःचा निर्णय बदलत क्रिकेट संघाला भारतात पाठवले. पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने शेवटचा भारत दौरा २०१६ मध्ये केला होता. यानंतर म्हणजेच सात वर्षानंतर हा संघ भारतात आला आहे.
पाकिस्तानचा संघ थेट हैदराबादला पोहोचला आहे, जिथे त्याला राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध पहिला सराव सामना खेळायचा आहे. यानंतर पाकिस्तानला ३ ऑक्टोबरला ICC Men’s World Cup 2023 साठी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा सराव सामना खेळायचा आहे.
नुकत्याच झालेल्या आशियायी चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाचे सामने झाले, त्यामध्ये भारताने पाकिस्तान संघाचा चांगलाच समाचार घेतला होता. आता विश्वचषक स्पर्धेत भारत संघ मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे विश्वचषक सामन्यात पाकिस्तानचा संघ भारतीय संघासमोर किती तग धरतो हे पहावे लागेल. ICC Men’s World Cup 2023 अंतर्गत १४ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाचा पाकिस्तानसोबत सामना होणार आहे.
(हेही वाचा ICC ODI Cricket World Cup : भारत-पाकिस्तान सामन्याचा दिवस बदलला, वेळापत्रकात किंचित फेरफार)
Join Our WhatsApp Community