Pakistan Cricket Team : पाकिस्तानी खेळाडूंदरम्यान हमरीतुमरी झाल्याचा पाक मीडियाचा दावा, क्रिकेट बोर्डाने आरोप फेटाळले

पाकिस्तानला अफगाणिस्तान सारख्या दुबळ्या संघाकडून पराभव पत्करावा लागलाय. पण, त्यापेक्षा जास्त चिंता संघातील वातावरणाविषयी पसरलेल्या बातम्यांनी निर्माण झाली आहे

166
Pakistan Cricket Team : पाकिस्तानी खेळाडूंदरम्यान हमरीतुमरी झाल्याचा पाक मीडियाचा दावा, क्रिकेट बोर्डाने आरोप फेटाळले

ऋजुता लुकतुके

क्रिकेटमधील सगळ्यात बेभरवशाचा संघ हा लौकिक पाक संघाने (Pakistan Cricket Team) यंदाही कायम ठेवलाय. अफगाणिस्तानच्या संघाने पाकचा आठ गडी राखून पराभव केला. तो ही २८२ ही धावसंख्या आरामात पार करत. अफगाणिस्तानने यापूर्वी गतविजेत्या इंग्लंडलाही असाच धक्का दिलेला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानची क्षमता नाकारण्याचं कारण नाही.

पण, पाक संघाबद्दल बोलायचं झालं तर पाकच्या (Pakistan Cricket Team) गोटातून येणाऱ्या बातम्या फारशा चांगल्या नाहीत. या पराभवालाही मैदानाबाहेरचं काहीतरी कारण असावं अशा बातम्या पाक मीडियाकडूनच येत आहेत. पाक संघात फलंदाजीत अपयशी ठरलेला कर्णधार बाबर आझमला एकटं पाडलं गेलं आहे आणि संघात तट पडले आहेत, अशा बातम्या पाक मीडियाकडूनच वारंवार दिल्या जात होत्या.

त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वीच (Pakistan Cricket Team) पाकमध्ये सोशल मीडियावर खेळाडूंमधील हमरातुमरी आणि मारामारीचे व्हीडिओ व्हायरल झाले आहेत. काही पाक पत्रकारांनी अफगाणिस्तान बरोबरच्या सामन्यानंतर अधिक तपशील उघड करू असंही जाहीर केलं आहे.

(हेही वाचा – Bangladesh Train Accident : दोन ट्रेन एकमेकांवर आदळल्या; २० जणांचा मृत्यू)

पाक माध्यमांमध्ये अशा बातम्या यायला लागल्यावर (Pakistan Cricket Team) पाक क्रिकेट बोर्डाला हस्तक्षेप करावा लागला. सोमवार २३ ऑक्टोबर रोजी पाक बोर्डाने यावर एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे.

पाक संघातील बेबनावाच्या बातम्या म्हणजे अफवा आहेत. त्यात काहीही तथ्य नाही, असं बोर्डाने तातडीने स्पष्ट केलं आहे.

पाक मीडियाने दिलेल्या बातम्याही सुस्पष्ट नाहीत. दोन खेळाडूंमध्ये (Pakistan Cricket Team) मारामारी झाल्याची शक्यता या बातमीत आहे. खेळाडूंचे दोन तट पडल्याची तसंच कर्णधार बाबर आझमला एका गटाने एकाकी पाडल्याचं बातमीत म्हटलं आहे. त्याला पुरावे दिलेले नाहीत.

‘काही माध्यमांनी पसरवलेल्या बातम्यांमध्ये (Pakistan Cricket Team) कुठलंही तथ्य नाही. आणि पाक संघ एकजीव होऊन खेळतो आहे. बेबनावाच्या बातम्या या अफवा आहेत,’ असं पाक बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. पाक संघाने या विश्वचषकात नेदरलँड्स आणि श्रीलंके विरुद्ध मोठे विजय मिळवून चांगली सुरुवात केली होती. पण, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारताकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. तर अफगाणिस्ताननेही ८ गडी राखून त्यांना हरवलंय.

या पराभवानंतर खेळाडूंमधील बेबनावाच्या बातम्यांना खतपाणीच मिळणार आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.