Pakistan in World Cup : बांगलादेश विरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता येईल का?

पाकिस्तान संघाने बांगलादेश विरुद्धच्या विजयानंतर आपलं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. पण, त्यांचा उपान्त्य फेरीचा प्रवास फारसा सोपा नाही

86
PCB in Action Mode : पाकिस्तान क्रिकेट संघासाठी आता असणार आचारसंहिता
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तान संघाने बांगलादेश विरुद्धच्या विजयानंतर आपलं स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे. पण, त्यांचा उपांत्य फेरीचा प्रवास फारसा सोपा नाही. (Pakistan in World Cup)

पाकिस्तान संघाने आपली ४ पराभवांची मालिका खंडित करून बांगलादेश विरुद्ध सात गडी राखून विजय मिळवला. संघाच्या या विजयानंतर कर्णधार बाबर आझम खुश होता आणि आता उपांत्य फेरीसाठी प्रयत्न करणार असं त्याने घोषित करून टाकलं. पण, प्रश्न आहे की हे इतकं सोपं आहे का? पाकिस्तानच्या संघाने उपांत्य फेरी गाठणं कुठल्या परिस्थिती शक्य होईल. (Pakistan in World Cup)

आज पाकिस्तान संघाने बांगलादेश विरुद्ध अष्टपैलू खेळ केला. आधी त्यांनी बांगला संघाला ४६ षटकांत २०४ धावांमध्ये गुंडाळलं. शाहीन आफ्रिदीच्या २३ धावांमध्ये ३ बळी या कामगिरीचा विजयात मोठा वाटा होता. त्यानंतर फखर झमान आणि अब्दुल्ला शफिकच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने ७ गडी राखून बांगलादेशचा पराभव केला. पाक संघाचं आव्हान या विजयामुळे नक्की जिवंत राहिलंय. पण, उपांत्य फेरीची वाटचाल तितकी सोपी नाही. (Pakistan in World Cup)

संघाला उरलेल्या सामन्यांमध्ये असेच मोठे विजय मिळवावे लागतील आणि इतर वरच्या क्रमांकावर असलेले संघ मोठ्या फरकाने हरावेत अशी प्रार्थनाही करावी लागेल. या पराभवानंतर बांगलादेशचा संघ स्पर्धेतून बाद होणारा पहिला संघ ठरला आहे. ७ सामन्यांत एकच विजयासह ते बाहेर फेकले गेले आहेत. तर इंग्लंड संघावरही तीच वेळ येऊ शकते. (Pakistan in World Cup)

याउलट पाकिस्तान संघ बांगलादेशवरील विजयानंतर पाचव्या स्थानावर पोहोचलाय आणि त्यांचा नेट रनरेटही – ०.०२४ इतका आहे. आता आगेकूच करण्यासाठी त्यांना सर्वप्रथम न्यूझीलंड आणि इंग्लंड विरुद्धचे सामने जिंकावे लागतील आणि मग ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया या संघांच्या वर राहण्यासाठी त्यांना या संघांची उर्वरित सामन्यांमधील कामगिरीही लक्षात घ्यावी लागणार आहे. (Pakistan in World Cup)

(हेही वाचा – Shreyas Iyer : मुंबईत श्रेयस अय्यरचा आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सराव)

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे सध्या प्रत्येकी ८ गुण झाले आहेत. सरस धावगतीच्या आधारे न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहेत. पण, या दोन्ही संघांनी पाकच्या तुलनेत एक सामना कमी खेळलाय. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड किंवा दक्षिण आफ्रिका यापैकी एका संघाची उर्वरित सामन्यात दाणादाण उडाली तर पाकिस्तानला उपांत्य फेरीच्या आशा बाळगता येतील. (Pakistan in World Cup)

सध्याच्या गणितानुसार, १० गुण मिळवणारा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो. पाक संघाचे आता ६ गुण आहेत. तर भारताचे १२, दक्षिण आफ्रिकेचे १०, न्यूझीलंडचे ८ आणि ऑस्ट्रेलियाचेही ८ गुण झाले आहेत. त्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि श्रीलंकेलाही उपांत्य फेरी गाठण्याच्या धुसर आशा बाळगता येतील. (Pakistan in World Cup)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.