Pakistan Super League : पाकिस्तान सुपर लीगमध्ये जेव्हा प्रेक्षक फोनवर आयपीएल पाहतात…

पीएसएल आणि आयपीएल एकाच वेळी सुरू आहेत.

70
Pakistan Super League : पाकिस्तान सुपर लीगमध्ये जेव्हा प्रेक्षक फोनवर आयपीएल पाहतात…
Pakistan Super League : पाकिस्तान सुपर लीगमध्ये जेव्हा प्रेक्षक फोनवर आयपीएल पाहतात…
  • ऋजुता लुकतुके

भारतात सध्या इंडियन प्रिमिअर लीग (IPL) सुरू असतानाच पाकिस्तानमध्येही पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) सुरू झाली आहे. तिथल्या स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिथल्या एका मैदानावर पीएसएलचा सामना सुरू असताना एक प्रेक्षक आपल्याकडच्या मोबाईलवर आयपीएलचा (IPL) सामना पाहत आहे असा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे दोन्ही लीगच्या लोकप्रियतेची अपरिहार्य चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. हा व्हिडिओ दोन्ही देशांत सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

काहीच दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी तेज गोलंदाज हसन अलीने (Hasan Ali) स्पर्धेच्या दर्जाविषयी भाष्य केलं होतं. आणि त्यानंतर हा व्हिडिओ पहायला मिळत आहे. ‘ज्या स्पर्धेत चांगलं क्रिकेट पहायला मिळतं आणि मनोरंजन होतं, त्या लीगला लोक पसंती देणार. पीएसएलमध्ये आम्ही चांगलं खेळलो तर लोक आयपीएल सोडून आम्हाला पाहतील,’ असं हसन अली (Hasan Ali) म्हणाला होता.

(हेही वाचा – JD Vance : अमेरिकेचे उपराष्ट्रपती चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर ; ‘या’ मंदिराला देणार भेट)

पीएसएल आणि आयपीएलमधील तुलना अविरत होत आहे. पीएसएल स्पर्धेचा पहिला आठवडा झाला आहे. संघांसाठी फ्रँचाईजीने मोजलेले पैसे, सामनावीर खेळाडूला मिळणारा पुरस्कार तसंच टीव्ही प्रसारणाचं शुल्क यांचे तुलनात्मक आकडे सोशल मीडियावर झळकत आहेत. तर पाकिस्तान मंडळाने दोन्ही स्पर्धांमध्ये वेळेचं अंतर रहावं यासाठी पीएसएलचे सामने अर्धा तास नंतर सुरू करण्याचा निर्णयही घेतला आहे.

(हेही वाचा – Tatkal Ticket Booking Time : अचानक फिरायचा प्लान झालाय? मग जाणून घ्या रेल्वे स्टेशनवर तत्काळ तिकीट बुकिंग कशी करायची?)

इंग्लंडचा सॅम बिलिंग्स (Sam Billings) पूर्वी आयपीएलमध्ये खेळला आहे. सध्या तो पीएसएलमध्ये खेळतोय. एका सामन्यानंतर पाक मीडियाने त्याला दोन्ही लीगची तुलना करण्याबद्दल सुचवलं. त्याने थेट उत्तर दिलं. ‘आयपीएल टी-२० लीगमध्ये सध्या सर्वोत्तम आहे. पीएसएल असो किंवा इंग्लंडमधील टी-२० लीग, या स्पर्धा दुसरी मोठी स्पर्धा म्हणवून घेण्यासाठी स्पर्धेत आहेत. पहिलं स्थान आयपीएलने (IPL) कधीच पटकावलं आहे,’ असं बिलिंग्सचं उत्तर होतं. पीएसएल स्पर्धेचा पहिला आठवडा सध्या पार पडला आहे. आणि इस्लामाबाद युनायटेड फ्रँचाईजी सध्या आधाडीवर आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.