यंदाचे वर्ष हे भारतीय क्रिकेटसाठी खूप महत्त्वाचे असणार आहे, कारण टीम इंडिया होम ग्राऊंडवर वनडे विश्वचषक स्पर्धा खेळणार आहे. हा विश्वचषक भारतात ऑक्टोबर महिन्यात खेळवला जाणार आहे. यासाठी बीसीसीआयकडून उत्तम आयोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. क्रिकेटप्रेमींसाठी ही एक पर्वणीच म्हणावी लागेल. यावर्षी आशिया कप पाकिस्तानमध्ये होणार असल्याने टीम इंडियाने पाकिस्तानमध्ये जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे, त्यामुळे वनडे वर्ल्डसाठी पाकिस्तान भारतात येणार का याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते.
( हेही वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात ‘या’ तारखेला होणार सुनावणी)
नेमके प्रकरण काय ?
BCCI व भारतीय संघाने पाकिस्तानात सामना खेळण्यास कायम नकार दिला आहे. त्यानुसार आशिया चषक आम्ही पाकिस्तानमध्ये खेळणार नाही. असे बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर वनडे वर्ल्डसाठी पाकिस्तान भारतात येणार नाही अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने घेतली होती. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार पाकिस्तानने भारतात खेळायला तयारी दर्शवली असून चेन्नई आणि कोलकातामध्ये सामने खेळण्यास सहमती दर्शवली आहे. तसेच पाकिस्तानला यापूर्वीच्या भारत दौऱ्यात चेन्नई आणि कोलकाता ही दोन केंद्रे सुरक्षित वाटली होती. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) आणि आयसीसीमध्ये या विषयी बरीच चर्चा झाली. विश्वचषक स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून एकूण ४६ सामने देशातील विविध स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community