ICC World Cup 2023 : पाकिस्तानी आयसीसी मीडिया प्रतिनिधी झैनब अब्बास भारतात झालेल्या टीकेनंतर पाकिस्तानला परतली

आपल्या भारत आणि हिंदूंविरोधी केलेल्या जुन्या ट्विट्समुळे वादात सापडलेली पाकिस्तानी डिजिटल मीडिया प्रतिनिधी झैनब अब्बासने अखेर भारत सोडला आहे.

223
ICC World Cup 2023 : पाकिस्तानी आयसीसी मीडिया प्रतिनिधी झैनब अब्बास भारतात झालेल्या टीकेनंतर पाकिस्तानला परतली
ICC World Cup 2023 : पाकिस्तानी आयसीसी मीडिया प्रतिनिधी झैनब अब्बास भारतात झालेल्या टीकेनंतर पाकिस्तानला परतली
  • ऋजुता लुकतुके

पाकिस्तानी डिजिटल मीडिया प्रतिनिधी झैनब अब्बास आयसीसीच्या डिजिटलं मीडिया चमूचा एक भाग होती. तिने अचानक हैद्राबाद सोडून पाकिस्तानला परतण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती कारणांसाठी ती परत जात असल्याचं आयसीसीने म्हटलंय. आपल्या भारत आणि हिंदूंविरोधी केलेल्या जुन्या ट्विट्समुळे वादात सापडलेली पाकिस्तानी डिजिटल मीडिया प्रतिनिधी झैनब अब्बासने अखेर भारत सोडला आहे. हैद्राबादमधून तिने दुबई गाठलं आहे. आधी भारतानेच तिला देशाबाहेर हाकलल्याची बातमी एका पाक वृत्तसंस्थेनं दिली होती. (ICC World Cup 2023)

पण, त्यानंतर सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं झैनबने घरगुती कारणांसाठी स्वत:हून पाकिस्तानला परतण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. झैनब आयीसीसीच्या डिजिटल चमूचा हिस्सा होती आणि पाकिस्तानी संघाबरोबर राहून ती सामन्यादरम्यान वार्तांकन आणि डिजिटल सादरीकरण करणार होती. संघाच्या हैद्राबादमधील पहिल्या तीन सामन्यांसाठी ती इथं आली होती. २ ऑक्टोबरला तिने आपल्या ट्विटर हँडलवर भारत आणि पाकिस्तान दरम्यानचं सांस्कृतिक साधर्म्य सांगणारं एक ट्विट केलं होतं. आणि पुढील सहा आठवड्यांसाठी क्रिकेट विश्वचषकाच्या निमित्ताने आपण भारतात असणार असल्याचंही यात म्हटलं होतं. (ICC World Cup 2023)

(हेही वाचा – Uday Samant : …विरोधकांनी त्याचे राजकारण करू नये…..!)

त्यानंतर पाकिस्तानच्या पहिल्या सामन्यादरम्यानही तिने वार्तांकन केलं. पण, त्यानंतर अचानक भारताविरोधात तिने केलेल्या जुन्या ट्विट्सवरून वाद निर्माण झाला. ही ट्विट्स भारत आणि हिंदू विरोधी असल्याची ओरड सुरू झाली. ही जुनी ट्विट्स पुन्हा सोशल मीडियावर फिरू लागली आणि विनित जिंदाल नावाच्या एका वकिलाने या ट्विटवरून तिच्याविरोधात पोलिसांमध्येही धाव घेतली. तसंच आयसीसी आणि बीसीसीआयलाही जिंदाल यांनी विनंती केली की, स्पर्धेच्या वार्तांकनाच्या चमूतून तिचं नाव हटवलं जावं. (ICC World Cup 2023)

या पोलीस तक्रारीनंतर भारतात झैनबवर टीका होऊ लागली होती आणि सोमवारी अचानक तिने भारत सोडल्याचं समोर आलं. सुरुवातीला पाकमधील एक टीव्ही वाहिनी समा न्यूजने तिला देशाबाहेर हाकलल्याचीच बातमी दिली होती. पण, काही वेळांनी वाहिनीने त्या आशयाचं ट्विट काढून टाकलं. आणि ती दुबईत सुरक्षित असल्याचं नवीन ट्विट केलं आहे. (ICC World Cup 2023)

तर पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना आयसीसीनेही तिला देशाबाहेर हाकललं नसल्याचं स्पष्ट केलं आहे. रमीझ राजा आणि वसिम अक्रम हे दोघे पाकिस्तानी समालोचक स्पर्धेच्या समालोचनासाठी भारतात आहेत. शिवाय पाक संघानेही भारतात आल्यापासून इथलं आदरातीथ्य आणि लोकांचा मिळालेला पाठिंबा यावर समाधानच व्यक्त केलं आहे. भारत वि. पाकिस्तान हा स्पर्धेतील महत्त्वाचा सामना येत्या १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर होणार आहे. (ICC World Cup 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.