- ऋजुता लुकतुके
भारताचा माजी तेज गोलंदाज आणि गोलंदाजीचा प्रशिक्षक पारस म्हांब्रे (Paras Mhambrey) मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतला आहे. तिथे आता तो गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळणार आहे. खरंतर मुंबईचा गोलंदाजीचा प्रशिक्षक लसिथ मलिंगा आहे. पण, म्हांब्रे मलिगांबरोबर काम करणार आहे. तर मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने असेल हे आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीने तशी अधिकृत घोषणा गुरुवारी केली आहे.
मागची अडिच वर्षं पारस म्हांब्रे (Paras Mhambrey) भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक होता. या कालावधीत भारतीय संघ आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचण्याबरोबरच टी-२० विश्वचषकही जिंकला. राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक असताना पारस म्हांब्रे प्रशिक्षकांच्या चमूचा भाग होता. जूनमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकानंतर द्रविड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. साधारण तेव्हापासूनच पारस म्हांब्रे मुंबई इंडियन्समध्ये घर वापसी करणार असल्याची चर्चा रंगली होती.
(हेही वाचा – ICC Hall of Fame : ॲलिस्टर कूक, एबी डिव्हिलिअर्स आणि नीतू डेव्हिड आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये)
𝐏𝐚𝐫𝐚𝐬 𝐌𝐡𝐚𝐦𝐛𝐫𝐞𝐲 returns HOME 💙
Read more 👉 https://t.co/f9oozQGg8e#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/qFHsPEkRs0
— Mumbai Indians (@mipaltan) October 16, 2024
राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक म्हणून द्रविडची जागा गौतम गंभीरने घेतल्यावर गोलंदाजीचा प्रशिक्षक म्हणून रायन टेन ड्युसकाटेची निवड झाली आहे. पारस म्हांब्रे (Paras Mhambrey) खेळाडू असताना मुंबईकडूनच क्रिकेट खेळला आहे. तर प्रशिक्षक म्हणूनही तो मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीबरोबर होता. २०१३ ची लीग आणि २०११ आणि २०१३ ची चॅम्पियन्स लीग मुंबई फ्रँचाजीने जिंकली तेव्हा तो संघाबरोबर होता. भारतीय संघाकडून तो २ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळला आहे. तर ९१ प्रथमश्रेणी सामने त्याच्या नावावर आहेत.
भारतीय संघाकडून इंग्लंड दौऱ्यावर तो २ कसोटी खेळला आणि यात त्याने २ बळी मिळवले. पण, त्याची गोलंदाजीची सरासरी ७० धावांची होती. एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्याची सरासरी ४० च्या वर होती. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसा यशस्वी होऊ शकला नाही.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community