Paris Olympic 2024 : पॅरिससाठीच्या ऑलिम्पिक संघात ५ नवोदित चेहरे

Paris Olympic 2024 : भारतीय पुरुष संघाचं नेतृत्व अपेक्षेप्रमाणेच हरमनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आलं आहे.

145
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचं विक्रमी तिकीट विक्री 
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचं विक्रमी तिकीट विक्री 
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचं नेतृत्व अपेक्षेप्रमाणेच हरमनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आलं आहे. तर हरेंद्र सिंग संघाचा उपकर्णधार असेल. हॉकी इंडियाने बुधवारी उशिरा भारतीय संघ जाहीर केला. यात नवीन तसंच ऑलिम्पिकचा पूर्वानुभव असलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकलेल्या भारतीय संघाचा समावेश बी गटात करण्यात आला आहे. इथं भारताबरोबरच बेल्जिअम, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, न्यूझीलंड आणि आयर्लंड हे संघ आहेत. (Paris Olympic 2024)

प्रत्येक गटातील अव्वल चार संघ उपउपांत्य फेरीत पोहोचतील. भारतीय संघाचं ऑलिम्पिक सराव शिबीर सध्या बंगळुरूच्या साई केंद्रात सुरू आहे. इथं सहभागी झालेल्या खेळाडूंच्या कामगिरीवरूनच संघाची निवड करण्यात आली आहे. पीआर श्रीजेश आणि मनप्रीत सिंग आपल्या चौथ्या ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत. तर कर्णधार हरमनप्रीत सिंगचंही हे तिसरं ऑलिम्पिक असेल. तर पाच खेळाडू पहिल्यांदाच भारताकडून ऑलिम्पिक खेळणार आहेत. जरमनप्रीत सिंग, संजय, राजकुमार पाल, अभिषेक आणि सुखजीत सिंग अशी या खेळाडूंची नावं आहेत. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – कोस्‍टल रोडच्‍या बाजूची मोकळी जागा बिल्‍डरांना देण्‍याचा घाट होता का?; Ashish Shelar यांची चौकशीची मागणी)

टोकयो ऑलिम्पिकमध्ये ४१ वर्षांनंतर भारताने ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं. या संघातील रुपिंदर पाल सिंग आणि विरेंद्र लाकरा हे खेळाडू आता निवृत्त झाले आहेत. तर सुरेंदर कुमारचा संघात समावेश झालेला नाही. निलकांता शर्मा आणि गोली कृष्णन पाठक हे राखीव खेळाडूंमध्ये आहेत. (Paris Olympic 2024)

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय पुरुष हॉकी संघ

हरमनप्रीत सिंग (कर्णधार), हरेंद्र सिंग (उपकर्णधार), श्रीजेश, जरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, सुमित, संजय, राजकुमार पाल, समशेर सिंग, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, अभिषेक, सुखजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग व गुरजंत सिंग (Paris Olympic 2024)

राखीव खेळाडू – निलकांता शर्मा, जुगराज सिंग, कृष्णन बहादूर पाठक (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.