Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पी व्ही सिंधूसह ७ भारतीय बॅडमिंटनपटू खेळणार

Paris Olympic 2024 : सोमवारी ऑलिम्पिक पात्रतेसाठीची कट-ऑफ तारीख होती. 

176
Paris Olympic 2024 : पॅरिसमध्ये भारतीय चमू पदकांचा नवीन उच्चांक रचेल, क्रीडामंत्र्यांना आशा
  • ऋजुता लुकतुके

पी व्ही सिंधू, एच एस प्रणॉय आणि लक्ष्य सेन या तिघांनी ऑलिम्पिकसाठी आपली जागा भक्कम केलीच होती. आता सोमवारच्या कट-ऑफ तारखेनंतर आणखी चार जणांची ऑलिम्पिक वारी निश्चित झाली आहे. पात्रता निकषानुसार, जागतिक बॅडमिंटन क्रमवारीतील पहिले सोळा खेळाडू हे ऑलिम्पिकमध्ये खेळू शकतात. माजी जगज्जेती आणि दोन ऑलिम्पिक पदकं नावावर असलेली सिंधू सध्या बाराव्या क्रमांकावर आहे. तर पुरुषांमध्ये प्रणॉय नवव्या आणि लक्ष्य तेराव्या स्थानावर आहे. (Paris Olympic 2024)

दुहेरीत सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय जोडी जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. या पाच जणांचा ऑलिम्पिक प्रवेश हा जवळ जवळ निश्चितच मानला जात होता. या जोडीच्या बरोबरीने अश्विनी पोनप्पा आणि त्रिशा केस्ट्रो या महिलांच्या दुहेरी जोडीनेही क्रमवारीत तेरावं स्थान मिळवत ऑलिम्पिकचं तिकीट नक्की केलं आहे. त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीची ऑलिम्पिक वारी थोडक्यात हुकली. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Love Jihad : अश्लिल व्हिडीओ बनवत नराधम हाशिम धर्मांतरासाठी टाकत होता दबाव )

भारताने आतापर्यंत बॅडमिंटनमध्ये तीन पदकं मिळवली आहेत आणि ही तीनही पदकं महिला एकेरीतून आली आहेत. पैकी २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्य पदक जिंकलं होतं. तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पी व्ही सिंधूने ऐतिहासिक रौप्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर टोकयो ऑलिम्पिकमध्ये सिंधूने कांस्य आपल्या नावावर केलं होतं. (Paris Olympic 2024)

टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताकडून सिंधू, साई प्रणित आणि दुहेरीतील सात्त्विकसाईराज, चिराग ही जोडी असे चार बॅडमिंटनपटू खेळले होते. त्या तुलनेत यंदा सात भारतीय बॅडमिंटनपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.