Paris Olympic 2024 : तिने सुवर्ण जिंकल्यावर मित्राने भर मैदानात घातली लग्नाची मागणी

Paris Olympic 2024 : चायनीज खेळाडूला एक पदक मिळालं आणि मिळाली लग्नाची अंगठी, असं वर्णन खुद्द बॅडमिंटन चायनाने केलं आहे.

211
Paris Olympic 2024 : तिने सुवर्ण जिंकल्यावर मित्राने भर मैदानात घातली लग्नाची मागणी
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन कोर्टवर सुवर्ण पदकाचा सामना सुरू असताना पडद्यामागे काही वेगळ्याच घडामोडी घडत होत्या. अंतिम फेरी असल्यामुळे सामना अटीतटीचा होता. खेळाडूंचं लक्ष पूर्णपणे खेळावर होतं आणि पडद्यामागे विजेतीला अनोखी भेट देण्याची तयारी सुरू होती. हुआंग या कियाँगने सुवर्ण जिंकलं तेव्हा तिला एक वेगळीच भेट मिळाली. तिच्याच संघातील एक सहकारी ली युचेनने तिला चक्क लग्नाची मागणी घातली. (Paris Olympic 2024)

मिश्र दुहेरीत हुआंगने सुवर्ण पटकावलं. चीन संघ हा विजय साजरा करत असतानाच हुआंगचा मित्र आणि सखा ली युचेनने चक्क गुडघ्यावर बसत हसून हुआंगसमोर वेडिंग रिंग ठेवली. हुआंगचा विरोध नव्हताच. त्यामुळे चीनी पथकात एकच जल्लोष झाला आणि दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Vishalgad हिंसाचारप्रकरणी अल्पसंख्यांक आयोगाची मुख्य सचिवांना नोटीस)

हुआंगने विजेतेपदानंतर सुवर्ण पदकाबरोबर फोटो काढला तेव्हाही तिने फोटोत अंगठी घातलेला हात पुढे केला होता. तिच्या चेहऱ्यावर होतं एक गोड हसू. विशेष म्हणजे थेट मैदानातच आलेली ही लग्नाची मागणी लियोगंने स्वीकारली आहे. लग्नाचा हा प्रस्ताव माझ्यासाठी आश्चर्यकारक होता. कारण मी स्पर्धेच्या तयारीत गुंतलेली होते. मी ऑलिम्पिक चॅम्पियन झाले अन् आता मला लग्नाचा प्रस्ताव मिळालाय. हा लग्नाचा प्रस्ताव मला अनपेक्षित होता, अशी प्रतिक्रिया लियोंगने दिली आहे. (Paris Olympic 2024)

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चीनचा संघ ११ सुवर्ण पदकांसह सध्या आघाडीवर आहे. यात बॅडमिंटनमधील पदकांचाही मोठा वाटा आहे. अशावेळी बॅडमिंटन संघाच्या गोटात या लग्नाच्या बातमीने वेगळा आनंद पसरला आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.