Paris Olympic 2024 : आता नजर अमन सेहरावत आणि रिले संघांवर; ९ ऑगस्टचं भारतीय संघाचं वेळापत्रक

Paris Olympic 2024 : जाणून घेऊया ९ ऑगस्टचं भारतीय पथकाचं संपूर्ण वेळापत्रक 

108
Paris Olympic 2024 : आता नजर अमन सेहरावत आणि रिले संघांवर; ९ ऑगस्टचं भारतीय संघाचं वेळापत्रक
Paris Olympic 2024 : आता नजर अमन सेहरावत आणि रिले संघांवर; ९ ऑगस्टचं भारतीय संघाचं वेळापत्रक
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) आता भारतीय पथकाच्या नावावर एक रौप्य आणि ४ कांस्य पदकं जमा झाली आहेत. नीरज चोप्राने (Neeraj Chopra) सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदकं जिंकण्याचा मान मिळवला आहे. आणि अशी कामगिरी करणारा तो सुशील कुमार (Sushil Kumar) आणि पी व्ही सिंधू (PV Sindhu) नंतरचा दुसरा ॲथलीट ठरला आहे. तर हॉकी संघानेही सलग दुसरं कांस्य पदक गुरुवारी पटकावलं. मनू भाकरने (Manu Bhaker) १० मीटर एअर पिस्तुलच्या वैयक्तिक आणि मिश्र सांघिक स्पर्धेत दोन कांस्य पदकं पटकावत भारताच्या यशाची मुहूर्तमेढ रोवली होती. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- BMC : रन टाईम सोल्यूशन्सच्या आधारे महापालिका उंचावणार प्रतिमा)

आता ऑलिम्पिकच्या उत्तरार्धात भारताला आशा आहेत त्या कुस्तीपटू अमन सेहरावत आणि गोल्फपटू अदिती अशोककडून. जाणून घेऊया ९ ऑगस्टचं भारतीय पथकाचं वेळापत्रक, (Paris Olympic 2024)

गोल्फ 

१२.३० – अदिती अशोक व दिक्षा डागर, महिलांचा वैयक्तिक स्ट्रोक प्ले तिसरा दिवस

ॲथलेटिक्स 

२.१० – महिलांची ४x१०० रिले शर्यत पहिली फेरी ज्योतिका दंडी, शुभा वेंकटेशन, विद्या रामराज, पूवम्मा एमआर

२.३५ – पुरुषांची ४x१०० रिले शर्यत पहिली फेरी महम्मद अनस, महम्मद अजमल, अमोज जेकब, संतोष तामीलारसन, राजेश रमेश

(हेही वाचा- Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : १.७२ लाख रोजगारासाठी १ लाख युवक-युवतींची मागणी नोंद)

कुस्ती 

९.४५ – रात्री अमन सेहरावतची कांस्य पदकाची लढत, वि. डॅरियन तोई क्रूझ (५७ किलो वजनी गट)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.