Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या टेनिस एकेरीतून अँडी मरेची माघार, दुहेरीत मात्र खेळणार

Paris Olympic 2024 : ग्रेट ब्रिटनचा सर्वात यशस्वी टेनिसपटू अँडी मरेनं दुखापतींमुळे हा कटू निर्णय घेतला आहे. 

168
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या टेनिस एकेरीतून अँडी मरेची माघार, दुहेरीत मात्र खेळणार
  • ऋजुता लुकतुके

दोनदा ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा ग्रेट ब्रिटनचा अँडी मरेनं यंदा ऑलिम्पिकच्या टेनिस एकेरीतून माघार घेण्याचा कटू निर्णय घेतला आहे. दुहेरी मात्र तो ठरल्याप्रमाणे खेळणार आहे. पॅरिस ऑलिम्पिक ही त्याची शेवटची व्यावसायिक स्पर्धा असेल हे त्याने आधीच जाहीर केलंय. त्यामुळे स्पर्धेनंतर तो टेनिसमधून निवृत्त होणार आहे. खरंतर आधी मरेनं एकेरीत खेळण्याची तयारीही चालवली होती. (Paris Olympic 2024)

पण, अचानक त्याला माघारीचा निर्णय घ्यावा लागला आहे. आता डॅन इव्हान्ससह तो फक्त दुहेरीवर लक्ष केंद्रीत करणार आहे. जून महिन्यातच मरेच्या पाठीच्या मणक्यात झालेल्या गाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर मोठ्या उमेदीने त्याने विम्बल्डन खेळण्याची तयारी चालवली होती. पण, या लाडक्या स्पर्धेतूनही त्याला माघार घ्यावी लागली. आता ऑलिम्पिक एकेरीतूनही तो बाहेर पडला आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: वारकऱ्यांचा ठिय्या! दिंड्या मागे ठेवून रथ निघाला पुढे)

अखेर निवृत्त होण हाच योग्य मार्ग – अँडी मरे

तीनदा ग्रँडस्लॅम विजेतेपदं पटकावलेला अँडी मरे ऑलिम्पिकमध्ये जास्त यशस्वी ठरला होता. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत रॉजर फेडररला हरवून त्याने पहिलं सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यानंतर चार वर्षांनी रिओ इथं त्याने कामगिरीची पुनरावृत्ती केली. ऑलिम्पिकमध्ये सलग दोन सुवर्ण जिंकलेला तो एकमेव व्यावसायिक टेनिसपटू आहे. (Paris Olympic 2024)

लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने लॉरा रॉबसनसह मिश्र गटात रौप्य पदकही जिंकलं होतं. ३७ वर्षीय अँडी मरेचं हे चौथं ऑलिम्पिक असणार आहे. यावेळी तो दुहेरीत आपलं नशीब आजमावणार आहे. मागचं वर्षभर आधी पायाचं दुखणं आणि त्यानंतर मणक्यातील गाठीवर झालेली शस्त्रक्रिया यामुळे तो बेजार आहे. अखेर निवृत्त होण हाच योग्य मार्ग आहे, असं तो गेल्याच आठवड्यात मीडियाशी बोलताना म्हणाला होता. त्यापूर्वी शेवटची स्पर्धा म्हणून तो ऑलिम्पिककडे पाहत आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.