Paris Olympic 2024 : मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी अंशू मलिक घेणार कुस्तीतून विश्रांती

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंशू सुरुवातीच्या फेरीतच पराभूत झाली होती.

90
Paris Olympic 2024 : मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी अंशू मलिक घेणार कुस्तीतून विश्रांती
Paris Olympic 2024 : मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी अंशू मलिक घेणार कुस्तीतून विश्रांती
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) कुस्तीपटू अंशू मलिक (Anshu Malik) चौथ्या फेरीपर्यंत पोहोचली. पण, पुढे तिचा अनपेक्षित पराभव झाला. ५७ किलो वजनी गटात अंशूने चांगली लढत उभी केली. आणि चौथ्या फेरीतही अमेरिकन प्रतिस्पर्धी हेलन लुईस मॉरोलिस विरोधात तिचे डावपेच चांगले होते. पण, हेलनने बचावात्मक कुस्तीचं सुरेख प्रदर्शन घडवून आणत अंशूचं आक्रमण काहीसं बोथट केलं. आणि गोंधळलेल्या अंशूला गुण कमावता न आल्याने तिचा पराभव झाला. आता या पराभवानंतर अंशूने काही महिने कुस्तीपासून विश्रांती घेण्याचं ठरवलं आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी हे आवश्यक असल्याचं तिला वाटतं.

हेलन विरुद्धचा तिचा सामना २-७ असा अमेरिकन कुस्तीपटूच्या बाजूने झुकला. पण, अंशूनेही आक्रमकता दाखवून आपल्या खेळाची छाप पाडली होती. प्रयत्नपूर्वक तयारी करूनही अपयशाशी सामना करावा लागल्यामुळे अंशू काहीशी निराश झाली आहे. पण, दुसरं ऑलिम्पिक खेळणारी २३ वर्षीय अंशू पुढील ऑलिम्पिकसाठीही जोरदार तयारी करणार आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – येत्या काही वर्षांत Mumbai ची खरी ओळख नाहीशी होईल? बंगळुरू थिंक टँकचा अहवाल काय सांगतो?)

‘पराभव स्वीकारणं कठीण असतं. पण, हा खेळ आहे. आणि खेळात हार – जीत होतच असते. निकाल काहीही लागला तरी कुस्तीवर माझं प्रेम आहे. आणि मी लढतच राहणार,’ असं अंशूने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anshu Malik (@anshumalik57___)

(हेही वाचा – Faiz Hameed: पाकिस्तानी लष्कराने माजी ISI प्रमुखाला ताब्यात घेतलं; कोर्ट मार्शलचे आदेश)

तिच्यातील लढाऊ बाण्यावर तिचा विश्वास आहे. आणि लॉस एंजलीस २०२८ ची तयारी सुरू करत असल्याचं तिने लिहिलं आहे. खरंतर अंशूचा हा संदेश जवळ जवळ १०० शब्दांचा आहे. मागच्या दोन वर्षांतील कामगिरी, त्यातून आलेलं नैराश्य आणि २०२४ मध्ये झालेला बदल याविषयी ती म्हणते, ‘मागची दोन वर्ष खूपच कठीण होती. मी एकही पदक जिंकू शकले नव्हते. त्यामुळेच ऑलिम्पिकचीही काळजी वाटत होती. पण, मी हार मानली नाही. ऑलिम्पिकपूर्वी दोन महिने आधी झालेल्या स्पर्धेत मला पात्रता मिळाली. पण, त्याही वेळात मी तयारी केली. आणि बुडापेस्ट मधील स्पर्धा जिंकून पॅरिसची चांगली तयारी केली होती. पण, यंदा पदक नशीबात नव्हतं. आता पु्न्हा तयारी करणार,’ असं तिने म्हटलं आहे.

अमेरिकन प्रतिस्पर्ध्याबरोबरचा सामना अंसू २-० अशा आघाडीनंतरही हरली, याचं दु:ख तिला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.