- ऋजुता लुकतुके
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) रशिया आणि बेलारुसचे ॲथलीट देशाचा ध्वज, राष्ट्रगीत तसंच बोधचिन्हाशिवाय त्रयस्थ म्हणून खेळणार. (Paris Olympic 2024)
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेनं (International Olympic Conference) रशिया आणि बेलारुसचे ॲथलीट आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) देशाचा ध्वज, राष्ट्रगीत आणि बोधचिन्हाशिवायच खेळतील असा निर्वाळा अखेर दिला आहे. हे ॲथलीट (Athletes) आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणार नाहीत तर ते त्रयस्थ म्हणून खेळतील. (Paris Olympic 2024)
आतापर्यंत रशिया आणि बेलारुसकडून ८ खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. तर युक्रेनचे ६०च्या वर खेळाडू पात्र ठरल्याचंही ऑलिम्पिक परिषदेनं (Olympic Conference) स्पष्ट केलं. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर तसंही सर्वच क्रीडा संघटनांनी रशियन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांत खेळायला परवानगी नाकारलेली आहे. (Paris Olympic 2024)
यावर्षी मार्च महिन्यात पहिल्यांदा ऑलिम्पिक परिषदेनं (Olympic Conference) रशियन खेळाडूंना ऑलिम्पिक ध्वजाखाली खेळण्याची परवानगी दिली होती आणि क्रीडा संघटनांना रशियन खेळाडूंना स्पर्धेत प्रवेश देण्याच्या सूचनाही परिषदेनं दिल्या. त्यानंतर हे खेळाडू ऑलिम्पिक ध्वजाखालीच खेळत आहेत. (Paris Olympic 2024)
Strict eligibility conditions in place as IOC Executive Board approves Individual Neutral Athletes (AINs) for the Olympic Games Paris 2024.
Read: https://t.co/j4qeeE0mxM pic.twitter.com/pLk0aKjL0F
— IOC MEDIA (@iocmedia) December 8, 2023
‘ज्या खेळाडूंनी ऑलिम्पिकसाठीचे पात्रता निकष पूर्ण केले आहेत, अशा रशियन आणि बेलारुसच्या खेळाडूंना त्रयस्थ म्हणून वैयक्तिक खेळांमध्ये भाग घेता यावा असा निर्णय ऑलिम्पिक परिषदेच्या (Olympic Conference) कार्यकारी समितीने घेतला आहे,’ असं ऑलिम्पिक परिषदेनं (Olympic Conference) काढलेल्या अधिकृत पत्रकात म्हटलं आहे. (Paris Olympic 2024)
म्हणजेच रशियन आणि बेलारुसचे खेळाडू फक्त वैयक्तिक स्पर्धाच खेळू शकतील. सांघिक प्रकारात त्यांना खेळता येणार नाही. (Paris Olympic 2024)
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने युक्रेनमधील चार प्रांत स्वतंत्र झाल्याचं जाहीर केलं होतं आणि त्या प्रांतांच्या स्थानिक क्रीडा संघटनांना मान्यताही देऊन टाकली. याविरुद्ध आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेनं (International Olympic Conference) कारवाई करत या संघटनांना मान्यता देणाऱ्या रशिया आणि बेलारुसच्या ऑलिम्पिक समित्यांची मान्यता ऑक्टोबर २०२२ मध्ये काढून घेतली आणि या देशाच्या खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी बंदीही घातली होती. (Paris Olympic 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community