Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचा रंगारंग उद्‌घाटन सोहळा, फ्रान्सची फॅशन आणि क्रीडा यांचा मिलाफ

Paris Olympic 2024 : नेहमीसारखा बंदिस्त मैदानात न घेता हा सोहळा सेन नदीच्या काठावर करण्यात आला 

206
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचा रंगारंग उद्‌घाटन सोहळा, फ्रान्सची फॅशन आणि क्रीडा यांचा मिलाफ
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचा रंगारंग उद्‌घाटन सोहळा, फ्रान्सची फॅशन आणि क्रीडा यांचा मिलाफ
  • ऋजुता लुकतुके

३३ व्या ऑलिम्पिक सोहळ्याला शुक्रवारी सेन नदीच्या साक्षीने आणि रंगारंग कार्यक्रमांनी सुरुवात झाली. फ्रान्सची संस्कृती, तिथल्या ऐतिहासिक जुन्या इमारती, राज्यक्रांतीचा ऐतिहासिक वारसा, तिथल्या भव्य इमारती आणि कलाकुसर या सगळ्यांना समावून घेणारा हा सोहळा इतर ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यांपेक्षा वेगळा आणि लक्षवेधी ठरला. उद्घाटनाच्या सोहळ्यात संघाचं संचलन किंवा ‘परेड ऑफ नेशन्स’ सगळ्यात महत्त्वाचं. यावेळी बंदिस्त मैदानात ते न होता चक्क सेन नदीवर रांच आणि बोटींतून हे संचलन झालं. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- कावड यात्रा मार्गावरील दुकानदारांच्या नामफलकाच्या वादानंतर Halal प्रकरण पोहचले सर्वोच्च न्यायालयात )

तब्बल २०५ राष्ट्रीय संघ आणि १ निर्वासितांचा संघ सेन नदीवरून रांचवर अवतरला. दुतर्फा उभारलेल्या तात्पुरत्या स्टेडिअममधून लाखो लोकांनी त्यांना मानवंदना दिली. पॅरिसमध्ये पावसाची भीती होती. पण, उद्घाटक आणि सहभागी खेळाडूही मोकळ्या आकाशात हा सोहळा करण्यावर ठाम राहिले. सगळ्यांनी सहकार्य करून हा सोहळा यशस्वी केला. (Paris Olympic 2024)

 यंदा उद्घाटन सोहळ्यातील सहा प्रमुख भाषांमध्ये हिंदीचाही समावेश होता. आपापलं कार्यक्षेत्र गाजवलेल्या फ्रेंच महिलांची ओळख करून देताना हिंदीचाही वापर झाला. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांनी ऑलिम्पिकचं उद्घाटन झाल्याचं जाहीर केलं. उद्घाटनाच्या सोहळ्याची सुरुवात फ्रान्सचा दिग्गज आणि विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार झेनेदिन झिदानने ऑलिम्पिक ज्योत प्रज्वलित करण्याच्या व्हीडिओनं झाली. पण, सोहळ्याचा केंद्रबिंदू खेळाडूंचं सेन नदीवर झालेलं संचलन हा होता. भारतीय पथकाचं नेतृत्व शरथ कमल आणि पी व्ही सिंधू यांनी केलं. (Paris Olympic 2024)

 खेळाडूंच्या संचलनाची सुरुवात ऑस्टरलिट्झ ब्रिजपासून झाली. तिथून सहा किलोमीटरवर असलेल्या आयफेल टॉवर जवळ त्याची सांगता झाली. ८५ बोटींमधून ६,८०० खेळाडू या संचलनात सहभागी झाले होते. फ्रेंच अद्याक्षरांच्या क्रमानुसार हे संचलन झालं. पहिला संघ परंपरेप्रमाणे ग्रीसचा होता. त्यानंतर निर्वासितांचा चमू आणि भारतीय पथकाचा क्रमांक ८४ वा होता. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Mumbai Local Megablock: घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा!)

या संचलनादरम्यान पॅरिसमधील प्रत्येक ऐतिहासिक वास्तूचं दर्शन खेळाडूंना आणि पर्यायाने लोकांना झालं. तसाच या संचलनाचा मार्ग आखलेला होता. नॉत्र दॅम, लोव्हर वस्तू संग्रहालय आणि ऑलिम्पिक क्रीडा प्रकार होणार असलेली विविधं मैदानं यांच्या साक्षीने हे संचलन झालं. या इमारती उजळलेल्या होत्या. (Paris Olympic 2024)

पॅरिसमध्ये तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धा होत आहेत. यापूर्वी १९०० आणि १९२४ मध्ये इथं ऑलिम्पिक झालं होतं. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.