Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकची सांगता; आता ऑलिम्पिक ध्वज लॉस एंजलीसच्या हातात

Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकचा निरोप समारंभ मात्र बंदिस्त स्टेडिअमवर झाला.

134
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकची सांगता; आता ऑलिम्पिक ध्वज लॉस एंजलीसच्या हातात
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकचा (Paris Olympic 2024) उद्धाटन समारंभ सेन नदीवर झाला होता. समारोपाचा समारंभ मात्र स्टेड दी फ्रान्स या बंदिस्त मैदानात पार पडला. पण इथंही पॅरिस शहराने आपली सौंदर्यदृष्टी दाखवून दिली. मैदानाला एखाद्या संगीत रजनी भरवणाऱ्या दालनाचं रुप आलं होतं. कलेचा मुक्त अविष्कार आणि ऑलिम्पिक ध्वज लॉस एंजलिस शहराकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम पॅरिसमध्ये थाटात पार पडला. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी पॅरिस ऑलिम्पिकची सांगता झाल्याचं जाहीर केलं.

फ्रेंच इंडी-रॉक बँड फिनिक्सचा कार्यक्रम समारंभाचं आकर्षण होता. आणि तो कार्यक्रम झालाही मंत्रमुग्ध करणारा. पण, कार्यक्रमात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते अमेरिकन स्टार टॉम क्रूझच्या आगमनाने. स्टेड दी फ्रान्सच्या छतावरून टॉम क्रूझने दोरीच्या सहाय्याने उडी मारली आणि मग जमिनीवरून घसरत तो स्टेजवर पोहोचला.

(हेही वाचा – MSPC: फार्मासिस्टची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे ‘विमा संरक्षणाची’ मागणी   )

पॅरिस शहराकडून लॉस एंजलीस शहराकडे आता ऑलिम्पिक ज्योत पोहोचली आहे आणि त्यासाठीच हा कार्यक्रम होता. स्टेजवर लॉस एंजलीसचे महापौर केरन बॉस हजर होते. आणि त्यांच्याबरोबरच अमेरिकन स्टार जिमनॅस्ट सिमॉन गाईल्स होती. या दोघांसह टॉम क्रूझने ऑलिम्पिक ध्वजाचा स्वीकार केला. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – समाजवादी पक्ष महाराष्ट्रात Congress चा खेळ बिघडविणार)

परंपरेप्रमाणे त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व संघांचं संचलन करण्यात आलं. यात भारतीय संघाचे ध्वजवाहक होण्याचा मान आपलं शेवटचं ऑलिम्पिक खेळून निवृत्त झालेल्या पी आर श्रीजेश आणि एकाच ऑलिम्पिकमध्ये दुहेरी पदक जिंकणाऱ्या मनू भाकेरला देण्यात आला. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषा यांनी पूर्वीच श्रीजेशचं नाव रौप्य पदक विजेत्या नीरज चोप्राने सुचवल्याचं स्पष्ट केलं होतं. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.