- ऋजुता लुकतुके
अंकिता भाकट (Ankita Bhakat) आणि धीरज बोम्मदेवरा (Dhiraj Bommadevara) ही तिरंदाजांची जोडी भारताला या ऑलिम्पिकमधील चौथं कांस्य पदक मिळवून देण्याच्या अगदी जवळ पोहोचली होती. पण, ऐनवेळी दडपणाने धात केला. अंकिताच्या दोन ७ गुणांच्या बाणांमुळे भारताचा अमेरिकेविरुद्ध २-६ असा पराभव झाला. भारताला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. (Paris Olympic 2024 )
(हेही वाचा- Paris Olympic 2024 : मनु भाकरची २५ मीटर अंतिम फेरी; दीपिका कुमारी, भजन कौर यांना अखेरची संधी )
तिरंदाजीतील उपान्त्य फेरी गाठणारी ही पहिली जोडी ठरली आहे. कांस्य पदकाच्या सामन्यात अमेरिकन जोडी कॅसी काऊफहोल्ड (Casey Kaufhold) आणि ब्रॅडी एलिसन (Brady Ellison) हे आव्हान खरंतर भारतीय जोडीसाठी तुलनेनं सोपं होतं. पण, दडपणाखाली अंकिताचा खेळ घसरला. ३७-३८, ३५-३७, ३८-३४, ३५-३७ अशा फरकाने अमेरिकन संघाचा विजय झाला. (Paris Olympic 2024 )
A tough finish for Dhiraj & Ankita as they miss the bronze in Mixed Team Archery 🎯
Catch all the highs and lows of the Olympics LIVE on #Sports18 and stream for FREE on #JioCinema! 👈#OlympicsOnJioCinema #OlympicsOnSports18 #JioCinemaSports #Cheer4Bharat #Paris2024 #Archery… pic.twitter.com/HDDihlU6k0
— JioCinema (@JioCinema) August 2, 2024
२२ वर्षीय धीरज आपलं पहिलं ऑलिम्पिक खेळतोय. ऑलिम्पिकमधील दडपणाविषयी त्याने शुक्रवारी एक महत्त्वाचं विधान केलं. ‘इतर स्पर्धांमध्ये खेळण्यापूर्वीचं दडपण १०-२० टक्के असेल तर इथं ते ३०-४० टक्के असेल असं मला आधी वाटलं होतं. पण, इथं आल्यावर कळलं, ऑलिम्पिकचं दडपण ८० टक्के मोठं आहे. त्याच्याशी जुळवून घेईपर्यंत अर्ध्याच्यावर स्पर्धा माझ्याासठी संपली आहे. आता मिश्र सांघिकसाठी निकराचा प्रयत्न करणार आहे,’ असं धीरज सामना सुरू होण्यापूर्वी म्हणाला होता. (Paris Olympic 2024 )
(हेही वाचा- Nitin Gadkari : रस्ते अपघातग्रस्तांसाठी केंद्र सरकारची नवी योजना, काय आहे पायलट प्रोजेक्ट?)
त्याप्रमाणे त्याच्या कामगिरीत मिश्र सांघिक स्पर्धेत सुधारणा दिसून आली. त्याने एकूण स्पर्धेत सहावेळा १० गुणांची कमाई केली. तर त्याचे किमान गुणही ९ होते. दुसरीकडे अंकिता भाकटने ४ वेळा दहा गुण मिळवले. कांस्य पदकाच्या सामन्यात दोनवेळा ७ गुण मिळवल्यामुळे भारतीय संघाचं कांस्य हुकलं. आता भारताचं तिरंदाजीतलं आव्हान महिलांच्या एकेरीत दीपिका कुमारी आणि भजन कौरच्या रुपात शिल्लक आहे. (Paris Olympic 2024 )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community