-
ऋजुता लुकतुके
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic 2024) टेनिस कोर्टवर एक लढत आधीपासूनच लक्षवेधी मानली जात होती. क्ले कोर्ट या आपल्या लाडक्या मैदानावर राफेल नदाल, (Rafael Nadal) नोवाक जोकोविचशी खेळणार होता. १४ फ्रेंच ओपन विजेतेपदं नावावर असलेला नदाल आणि जोकोविच दुसऱ्याच फेरीत आमने सामने आल्यामुळे पॅरिसमधील स्पर्धा जिवंत करणारी ही लढत असं तिचं वर्णन होत होतं. आणि अशा या लढतीत जोकोविचने नदालचा ६-१ आणि ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
दुसऱ्या सेटमध्ये नाही म्हणायला जोकोविचने काही काळ आपली एकाग्रता घालवली होती. पण, अखेर हा सेटही त्याने ६-४ ने जिंकला. जोकोविच या विजयासह तिसऱ्या फेरीत पोहोचला आहे. त्याच्या नावावर सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम विजेतेपदं आहेत. पण, ऑलिम्पिक सुवर्ण त्याने एकदाही जिंकलेलं नाही. यंदा तेच जिंकण्यासाठी खेळत असल्याचं जोकोविचने आधीच जाहीर केलंय. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा – Karnataka Congress : सरकारी योजनांच्या नावाखाली कर्नाटकात काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांना देणार भरघोस पगार)
A rally to remember 🥶🤯
Catch Nadal & Djokovic in action and keep watching the #OlympicGamesParis2024 LIVE on #Sports18 & stream for FREE on #JioCinema 👈#OlympicsonJioCinema #OlympicsonSports18 #Cheer4Bharat #Paris2024 pic.twitter.com/Q07JxIjScr
— JioCinema (@JioCinema) July 29, 2024
३८ वर्षीय नदाल ऑलिम्पिकपूर्वीही दुखापतींसी झगडत होता. आणि पहिल्या फेरीनंतरही पाय दुखत असताना त्याने एकेरी खेळत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जोकोविचशी मुकाबला नदालसाठी सोपा नव्हताच. त्याने याच मैदानावर १४ फ्रेंच ओपन विजेतेपदं पटकावली आहेत. पण, जोकोविच विरुद्ध त्याची क्लेवरील हुकुमत दिसून आली नाही. पहिला सेट तर जोकोविचने ६-१ असाच जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये नदालने ४-४ अशी बरोबरी साधेपर्यंत मजल मारली होती. (Paris Olympic 2024)
पण, त्यानंतर सामना त्याच्या हातातून निसटला. काही नाहक चुकाही त्याला नडल्या. ऑलिम्पिकमधील पराभवानंतर आपल्या एकेरी कारकीर्दीचा गांभीर्याने विचार करणार असल्याचं राफेल नदालने म्हटलंय. (Rafael Nadal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community