Paris Olympic 2024 : दुहेरी पदकविजेती मनु भाकर पुन्हा एकदा मैदानात; काय आहे २ ऑगस्टचं भारतीय संघाचं वेळापत्रक?

Paris Olympic 2024 : मनू भाकेर आणि लक्ष्य सेन यांच्यावर शुक्रवारी नजर असेल

179
Paris Olympic 2024 : आता नजर अमन सेहरावत आणि रिले संघांवर; ९ ऑगस्टचं भारतीय संघाचं वेळापत्रक
Paris Olympic 2024 : आता नजर अमन सेहरावत आणि रिले संघांवर; ९ ऑगस्टचं भारतीय संघाचं वेळापत्रक
  • ऋजुता लुकतुके

या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत दोन कांस्य पदकं जिंकलेली मनू भाकेर (Manu Baker) शुक्रवारी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. यावेळी तिचा आवडता प्रकार २५ मीटर रॅपिट पिस्तुल खेळण्यासाठी. तिला यंदा पदकांची हॅट ट्रीक साधण्याची अनोखी संधी आहे. ईशा सिंगच्या (Esha Singh) साथीने ती या प्रकारात खेळणार आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Jammu and Kashmir मध्ये पाकिस्तानी घुसखोर ठार, शस्त्रे जप्त)

त्याचबरोबर बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननेही उपउपांत्य फेरी गाठताना चांगला फॉर्म दाखवून दिला आहे. त्यामुळे त्याच्या सामन्याकडेही भारतीयांची नजर असेल. त्या व्यतिरिक्त गोल्फ, मिश्र सांघिक तिरंदाजी आणि हॉकीचेही महत्त्वाचे सामने शुक्रवारी होणार आहेत. एक नजर टाकूया भारतीय संघाच्या वेळापत्रकावर.  (Paris Olympic 2024)

नेमबाजी 

१२.३० – मनू भाकेर व ईशा सिंग, वैयक्तिक २५ मीटर पिस्तुल प्रिसिजन प्रकार, पात्रता फेरी

१.०० – अनंतजीत सिंग नरुका पुरुषांची स्कीट पात्रता फेरी

३.३० – मनू भाकेर व ईशा सिंग, वैयक्तिक २५ मीटर एअर पिस्तुल रॅपिड प्रकार, पात्रता फेरी

(हेही वाचा- घरात बसणाऱ्यांनी मैदानात उतरण्याची भाषा करू नये! CM Eknath Shinde यांचा उद्धव ठाकरेंना टोला)

तिरंदाजी 

१.१९ – धीरज बेमादेवरा व अंकिता भाकट, मिश्र सांघिक रिकर्व्ह प्रकारात अंतिम ८ जणांची बाद फेरी

५.४५ – धीरज बोमादेवरा व अंकिता भाकट, मिश्र सांघिक रिकर्व्ह प्रकारात उपउपान्त्य फेरी (पात्र ठरल्यास)

७.०१ – संध्याकाळी धीरज बोमादेवरा व अंकिता भाकट, मिश्र सांघिक रिकर्व्ह प्रकारात उपान्त्य फेरी (पात्र ठरल्यास)

७.४५ – संध्याकाळी धीरज बोमादेवरा व अंकिता भाकट, मिश्र सांघिक रिकर्व्ह प्रकारात कांस्य पदकाची लढत (उपान्त्य फेरीत पराभव झाल्यास)

८.१५ – रात्री धीरज बोमादेवरा व अंकिता भाकट, मिश्र सांघिक रिकर्व्ह प्रकारात सुवर्ण पदकाचा सामना (पात्र ठरल्यास)

ज्युदो 

१.३० – तुलिका मान महिलांची ७८ किलो वजनी गटातील अंतिम ३२ मधील लढत

२.३० – तुलिका मान महिलांची ७८ किलो वजनी गटातील अंतिम १६ मधील लढत

३.३० – तुलिका मान महिलांची ७८ किलो वजनी गटातील उपउपान्त्य लढत (पात्र ठरल्यास)

७.३० – तुलिका मान महिलांची ७८ किलो वजनी गटातील रेपिचाझ लढत किंवा उपान्त्य लढत (पात्र ठरल्यास)

७.४५ – तुलिका मान महिलांची ७८ किलो वजनी गटातील कांस्य पदकाची लढत (पात्र ठरल्यास)

८.१५ – तुलिका मान महिलांची ७८ किलो वजनी गटातील अंतिम फेरी (पात्र ठरल्यास)

(हेही वाचा- Love Jihad : पुण्यातील पतित पावन संघटनेची मागणी; जिहाद्यांच्या विरोधात कठोर कायदा झालाच पाहिजे)

रोइंग 

१.४८ – बलराज पनवर स्कल्स प्रकारातील अंतिम फेरी

सेलिंग 

३.४५ – नेत्रा कुमानन डिंगी रेस ३ व ४

७.०५ – संध्याकाळी विष्णू सर्वानन डिंगी रेस ३ व ४

(हेही वाचा- BMC : रस्ते आणि पदपथ धुण्यासाठी २७ कोटींच्या सात वाहनांची खरेदी; देखभालीसाठी ७५ कोटींचा खर्च)

हॉकी 

४.४५ – पुरुषांचा गटवार साखळी सामना वि. ऑस्ट्रेलिया

बॅडमिंटन 

६.३० – लक्ष्य सेन पुरुषांचा उपउपान्त्य फेरीचा सामना

ॲथलेटिक्स 

९.४० – अंकिता ध्यानी महिलांची ५,००० मीटर स्पर्धा

१०.०६ – पारुल चौधरी महिलांची ५,००० मीटर स्पर्धा हिट दुसरी

११.४० – तेजिंदरपाल तूर पुरुषांची शॉट पुट

हेही पहा-  

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.