- ऋजुता लुकतुके
२०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदक जिंकणारा नेमबाज गगन नारंग पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय पथकाचा शेफ दी मिशन असेल. यापूर्वी मुष्टीयोद्धा मेरी कोम हे पद भूषवणार होती. पण, दोन महिन्यांपूर्वी वैयक्तिक कारणांमुळे मेरीने या माघार घेतली होती. ‘मेरी कोमने माघार घेतल्यानंतर गगन नारंगला उपकर्णधार पदावरून बढती देण्याचा निर्णय नैसर्गिक होता. खेळाडूंच्या पथकाचा शेफ हा पदक विजेता खेळाडूच असावा असा माझा आग्रह होता. आणि गगन, मेरीच्या खालोखाल उप शेफ दी मिशन होताच. त्यामुळे निर्णय घेणं कठीण गेलं नाही,’ असं भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनची अध्यक्षा पी टी उषा यांनी बोलून दाखवलं आहे. (Paris Olympic 2024)
मेरी कोमची नियुक्ती झाली तेव्हाही गगन नारंग शेफ दी मिशनसाठी स्पर्धेत होता. पण, तेव्हा माजी महिला खेळाडू म्हणून मेरीच्या नावाला प्राधान्य देण्यात आलं होतं. (Paris Olympic 2024)
Press Release 🚨 pic.twitter.com/hRv5iuTGnU
— Team India (@WeAreTeamIndia) July 8, 2024
(हेही वाचा – Paris Olympic 2024 : पी व्ही सिंधू, शरथ कमल भारतीय पथकाचे ध्वजवाहक)
गगन नारंगच्या नियुक्तीबरोबरच भारतीय पथकाची महिला ध्वजवाहक म्हणून पी व्ही सिंधूची निवडही करण्यात आली आहे. त्यामुळे आता शरथ कमलच्या बरोबरीने सिंधू भारतीय पथकाचं उद्गाटन समारंभात नेतृत्व करेल. २६ जूलै ते ११ ऑगस्ट दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकचं आयोजन होणार आहे. यंदा भारतीय पथकाने पदकांचा दुहेरी आकडा गाठावा असं उद्दिष्टं भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने ठेवलं आहे. (Paris Olympic 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community