- ऋजुता लुकतुके
अभिनव बिंद्राने १६ वर्षांपूर्वी २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पहिलं वैयक्तिक सुवर्ण जिंकलं होतं. अशा कसोटीच्या वेळी येणारं दडपण कसं हाताळायचं याचा पुरेपुर अनुभव अभिनवला आहे. आताही पॅरिसला जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना त्याने एक सोपा पण आचरणात आणण्यासाठी कठीण सल्ला दिला आहे. ‘तो क्षण जगा आणि परिस्थितीनुरुप बदलण्याची लवचिकता ठेवा.’ (Paris Olympic 2024)
१० मीटर एअर रायफल या नेमबाजीतील प्रकारात बिंद्राने सुवर्ण जिंकलं होतं. भारतीय ॲथलेटिक्स फेडरेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्याने काही भारतीय खेळाडूंशी संवाद साधला. ‘पॅरिसला निघालेल्या सगळ्या खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. मागच्या काही वर्षातील सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आम्हाला आधीपासूनच त्यांचा अभिमान आहे. आता जागतिक स्तरावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी त्यांच्याकडे चालून आली आहे,’ असं बिंद्रा यावेळी बोलताना म्हणाला. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा – धर्मांतरामुळे हिंदू अल्पसंख्यांक होतील; Allahabad High Court ने व्यक्त केली चिंता)
मेहनतीला न्याय देणारी कामगिरी आवश्यक – अभिनव बिंद्रा
खरा आत्मविश्वास हा केलेल्या प्रयत्नांतूनच येतो, असं म्हणत विश्वनाथन आनंद पुढे म्हणतो, ‘ऑलिम्पिक हे क्रीडा क्षेत्रासाठी सर्वोच्च व्यासपीठ आहे. इथं चांगली कामगिरी करण्यासाठी मानसिक संतुलन आणि आतापर्यंत जी मेहनत घेतली तिला न्याय देणारी कामगिरी आवश्यक आहे,’ असं ४१ वर्षीय अभिनव बिंद्रा म्हणाला. (Paris Olympic 2024)
चंदिगडमध्ये झालेल्या या समारंभात शॉटपूट खेळाडू तेंजिंदरपाल सिंग, भालाफेकपटू किशोर जाना आणि धावपटू हीमा दासही उपस्थित होते. नीरज चोप्राच्या सुवर्णामुळे भारतीय ॲथलेटिक्स क्षेत्रात क्रांती घडून आल्याचं तेजिंदरपालने बोलून दाखवलं. ‘नीरज चोप्राने टोकयोमध्ये इतिहास रचला. त्यामुळे ॲथलीटना आता त्या कामगिरीच्या पुनरावृत्तीची आस लागली आहे. मला आशियाई विजेतेपद मिळालं. आता ते ऑलिम्पिक यशात बदलायचं आहे. टोकयोपेक्षा जास्त पदकं आम्ही पॅरिसमध्ये नक्की जिंकू,’ असं तेजिंदरने बोलून दाखवलं. तर किशोर जानाने २०२१ पासून केंद्र सरकार आणि क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या आर्थिक पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानले. (Paris Olympic 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community