Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाचा पहिला सामना न्यूझीलंडशी

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाचे ड्रॉ जाहीर झाले आहेत. 

244
Paris Olympic 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हॉकी संघाचा पहिला सामना न्यूझीलंडशी
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकचा हॉकी स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झाला असून भारतीय संघाचा पहिला सामना २७ जुलैला न्यूझीलंड विरोधात होणार आहे. टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्य पदक जिंकलं होतं. यंदा ए गटात भारतीय संघाची वर्णी लागली आहे. आणि या गटांत भारताबरोबरच अर्जेंटिना, आयर्लंड, बेल्जिअम, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. (Paris Olympic 2024)

भारताचा दुसरा सामना २९ जुलैला अर्जेंटिना विरुद्ध होणार आहे. लगेच ३० तारखेला आयर्लंड आणि १ ऑगस्टला बेल्जिअम तर २ ऑगस्टला ऑस्ट्रेलियाबरोबर भारतीय संघ दोन हात करेल. ए गटात नेदरलँड्स, स्पेन, जर्मनी, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा – Jaunpur : जौनपूरमध्ये मुंबईचा बाहुबली जिंकणार की जौनपूरचा? कृपाशंकर सिंह यांच्यासाठी निवडणूक का नाही सोपी?)

या स्टेडिअमवर रंगणार हॉकीचे सामने

दोन्ही गटातून पहिले चार संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. आणि उपउपांत्य फेरीच्या लढती या ४ ऑगस्टला रंगतील. त्यानंतर ६ ऑगस्टला उपांत्य फेरीच्या दोन लढती होतील. आणि कांस्य पदकाचा सामना तसंच अंतिम सामना हा ८ ऑगस्टला होईल. पॅरिसजवळ कोलंबस शहरांतील वेस-दू-मनोर या स्टेडिअमवर हॉकीचे सामने रंगणार आहेत. गतविजेते बेल्जिअम यंदाही आपलं सुवर्ण पदक राखण्याचा प्रयत्न करतील. (Paris Olympic 2024)

हॉकी स्पर्धेच्या ड्रॉसाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेचे अध्यक्ष थॉमस बाख हजर होते. हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष तय्यब इक्रम यांच्या हस्ते ड्रॉ काढण्यात आला. (Paris Olympic 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.