- ऋजुता लुकतुके
हॉकीच्या गटवार साखळीत भारताला पहिला पराभवाचा सामना गुरुवारी करावा लागला. गतविजेत्या बेल्जिअमने भारताचा २-१ ने पराभव केला. खरंतर सामन्यात १८ व्या मिनिटाला गोल करत भारताने आघाडी घेतली होती. पण, बेल्जिअमने (Belgium) या धक्क्यातून सावरत नेहमीचा तगडा खेळ करत सामन्यात विजय मिळवलाच. बेल्जिअमचा संघ आतापर्यंत साखळीत अपराजित आहे. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- त्यांना लाज, लज्जा, शरम वाटली पाहिजे; वेश बदलण्याच्या चर्चांवर Ajit Pawar भडकले)
अभिषेकने १८ व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली होती. अभिषेकचा (Abhishek) हा गोल अप्रतिम होता. पण, त्यानंतरही भारतीय संघाला वर्चस्व असं गाजवता आलं नाही. बेल्जिअमचा बचाव अभेद्यच होता. आक्रमण सुसुत्र होतं. आधी ३६ व्या मिनिटाला त्यांनी बरोबरी साधली. आणखी ११ मिनिटांनी दुसरा गोल करत त्यांनी २-१ अशी आघाडी घेतली. (Paris Olympic 2024)
INDIA LOSE NARROWLY TO WR 1 BELGIUM
Belgium, who had defeated Australia 6-2, a few days ago came back to defeat India 2-1 in a close encounter.
Abhishek scored the only goal for India, who have already qualified for the QF.
Next up vs 🇦🇺 pic.twitter.com/07fVyfZHyU
— SPORTS ARENA🇮🇳 (@SportsArena1234) August 1, 2024
भारतीय संघाने बरोबरीचे निकराचे प्रयत्न केले. सामन्याला शेवटची २ मिनिटं बाकी असताना संघाकडे एक सुरेख संधी चालून आली होती. पेनल्टी कॉर्नरवर पुन्हा एकदा हरमनप्रीतकडे चेंडूचा ताबा होता. आतापर्यंत या स्पर्धेत त्याने ४ गोल केले आहेत. आताही त्याने गोलजाळ्याच्या दिशेनं एक जोरकस फटका मारला. पण, बेल्जिअमच्या बचाव फळीतील गोलजाळ्याजवळ उभ्या असलेल्या खेळाडूने स्टिकने शेवटच्या क्षणी हा चेंडू अडवला. या अप्रतिम बचावामुळे भारताला गोल हुकला. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- Sion Bridge : वाहतुकीसाठी सायन पूल बंद! ऑफिसला जाणारे कर्मचारी वाहतुक कोंडीत अडकले)
भारतीय (India) संघाचा हा पहिला पराभव होता. तर बेल्जिअम संघाने चारही सामने जिंकत ब गटात अव्वल स्थान राखलं आहे. भारतीय संघाचा मुकाबला शुक्रवारी ऑस्ट्रेलियाशी (Australia) होणार आहे. दोन्ही संघांनी बाद फेरीत प्रवेश केला आहे. पण, पुढील प्रत्येक निकालामुळे बाद फेरीतील प्रतिस्पर्धी संघ ठरणार असल्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. (Paris Olympic 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community