Paris Olympic 2024 : जर्मनीविरुद्ध शेवटच्या ८ सेकंदातही भारताने गोलचा जोरदार प्रयत्न केला….

Paris Olympic 2024 : भारतीय संघ अंतिम फेरीच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण….

86
Paris Olympic 2024 : जर्मनीविरुद्ध शेवटच्या ८ सेकंदातही भारताने गोलचा जोरदार प्रयत्न केला….
Paris Olympic 2024 : जर्मनीविरुद्ध शेवटच्या ८ सेकंदातही भारताने गोलचा जोरदार प्रयत्न केला….
  • ऋजुता लुकतुके

पॅरिस ऑलिम्पिकच्या हॉकी उपांत्य सामन्यात भारतावर २-३ ने मात करून जर्मनी अंतिम फेरीत पोहोचली आहे. तर भारताला मात्र मैदानी खेळात चांगलं वर्चस्व दाखवूनही अंतिम फेरीपासून वंचित राहावं लागलं. शेवटच्या ६ मिनिटांत खेळाचं पारडं अचानक जर्मनीकडे झुकलं. ५४ व्या मिनिटाला जर्मनीच्या मार्को मिल्टकाओनं तो आपल्या संघाला पुढे घेऊन जाणारा गोल केला. तरीही भारताने जिद्द सोडली नव्हती. शेवटच्या सहा मिनिटांत गोल करण्याचे दोन तगडे प्रयत्न केले. एक पेनल्टी कॉर्नरही मिळवला. पण, जर्मनीने चांगला बचाव करत भारताला रोखलं. यात शेवटच्या क्षणी म्हणजे ८ सेकंद उरलेली असताना समशेर सिंगने केलेला शेवटचा निकराचा प्रयत्न आता सगळ्याचं लक्ष वेधून घेत आहे. त्याने मारलेला हा चेंडू जर्मन गोलजाळ्याच्या थोड्या वरून गेला. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : हॉकीत सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगलं, शेवटच्या क्षणी गोल करून जर्मनी अंतिम फेरीत )

हरमनप्रीतने (Harmanpreet) चेंडू अचूक स्ट्रायकिंग सर्कलमध्ये आणला होता. शेवटच्या क्षणी पास शमशेर सिंहकडे (Shamsher Singh) दिला. हा पास घेण्याची अचूकता समशेरने दाखवली. त्याचा गोलचा प्रयत्नही वाखाणण्यासारखा होता. पण, नेमका स्कूप केलेला चेंडू गोलजाळ्याच्या वरून गेला.  (Paris Olympic 2024)

सामन्यातील संपूर्ण ६० मिनिटांत भारताने एकूण ११ पेनल्टी कॉर्नर मिळवले. पण, यातील फक्त एका पेनल्टी कॉर्नरवर गोल होऊ शकला. तर जर्मनीने फक्त ४ पेनल्टी कॉर्नर मिळवले. यातील एकावर गोल केला. तर एक पेनल्टी स्ट्रोक मिळवला. भारतीय संघाचा आता कांस्य पदकासाठी सामना ८ ऑगस्टला संध्याकाळी साडेपाच वाजता स्पेनशी होणार आहे. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.