- ऋजुता लुकतुके
भारतीय पुरुष हॉकी संघाने आयर्लंडवर २-० असा विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान पक्कं केलं आहे. दुसऱ्या हाफमध्ये संघाचा बचाव थोडा ढिला पडला होता. पण, त्याचा परिणाम सुदैवाने निकालावर झाला नाही. पहिल्या दोन क्वार्टरवर तर भारताचंच वर्चस्व होतं. कर्णधार हरमनप्रीतने (Harmanpreet) हे दोनही गोल केले. पहिल्या दोन्ही क्वार्टरमध्ये भारतीय संघाने एकामागून एक चढाया करत आयर्लंडला बेजार केलं. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- palash tree : पलाशचे झाड म्हणजे म्हणजे काय? काय आहेत पलाश झाडाचे फायदे?)
चेंडू सतत आयर्लंडच्याच गोलजाळ्यापाशी होता. तेराव्या तसंच एकोणीसाव्या मिनिटाला भारताचे झटपट दोन गोल झाले. क गटात आता बाद फेरीचं रंगतदार चित्र उभं राहिलं आहे. याच गटात बेल्जिअम (Belgium) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) हे दोन बलाढ्य संघ आहेत. दोघंही साखलीत अपराजित आहेत. या दोन्ही संधांदरम्यान गुरुवारी होणारा सामना गटातील क्रमवारी ठरवताना महत्त्वाचा ठरणार आहे. (Paris Olympic 2024)
FT:
A good win today against Ireland.
2 smashing goals from Harmanpreet Singh one via a Stroke and one from Penalty Corner.
A nearly perfect game from Team India with no goals conceded in the game.
Strong performance from the defence and the wall Sreejesh.This win… pic.twitter.com/KEh0akUzCI
— Hockey India (@TheHockeyIndia) July 30, 2024
भारतीय संघाने या सामन्यात आयर्लंडला एकूण १० पेनल्टी कॉर्नर बहाल केले. या संधींवर गोल न करणं ही आयर्लंडची कमजोरी ठरली असली, तरी भारतीय संघाच्या दृष्टीने प्रतिस्पर्ध्यांना संधी न देणं हे इथून पुढे महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, कदाचित बाद फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताची लढत ऑस्ट्रेलिया किंवा बेल्जिअमशी पडू शकते. (Paris Olympic 2024)
(हेही वाचा- शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेते पदी खासदार Dhairyashil mane यांची निवड)
आयर्लंड विरुद्ध पहिले दोन क्वार्टर भारताचे ठरले. तिसरा क्वार्टर आयर्लंडच्या ताब्यात होता. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने पुन्हा एकदा वर्चस्व मिळवलं. भारतीय कर्णधार हरमनप्रीतने (Harmanpreet) सामन्यात २ तर स्पर्धेत आतापर्यंत चार गोल केले आहेत. गटवार साखळीत तोच सगळ्यात जास्त गोल करणारा हॉकीपटू ठरला आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला असला तरी बाद फेरीत बचावावर संघाला नक्कीच लक्ष द्यावं लागणार आहे. (Paris Olympic 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community