- ऋजुता लुकतुके
भारतीय हॉकी संघाने पिछाडीवरून चांगला खेळ करण्याची परंपरा सलग दुसऱ्या सामन्यात कायम ठेवली. पॅरिस ऑलिम्पिकच्या दुसऱ्या साखळी लढतीत बलाढ्य अर्जेंटिनाविरुद्ध भारतीय संघ ०-१ ने पिछाडीवर होता. चौथ्या क्वार्टरचं फक्त दीड मिनिट बाकी होतं. अशावेळी एक निकराचं आक्रमण करत आधी भारताने पेनल्टी कॉर्नर मिळवला. या संधीचं सोनं करत हरमनप्रीत सिंगने भारताला बरोबरीही मिळवून दिली. (Paris Olympic 2024)
आधीच्या न्यूझीलंड बरोबरच्या सामन्यातही भारतीय संघ पिछाडीवरून बाजी मारुन गेला होता. तेव्हाही हरमनप्रीतचाच गोल मोलाचा ठरला होता. अर्जेंटिनाने या सामन्यात २२ व्या मिनिटालाच खातं उघडलं. भारतीय संघावर चांगलंच दडपण होतं. आणि त्यातच खेळातही शिथिलता होती. मनप्रीत सिंग आणि हरेंद्र कुमार हे मिडफिल्डर धिमा खेळ करत होते. त्यामुळे सुरुवातीला सामन्यावर भारताचा प्रभावच दिसला नाही. पण, नशीबाने अर्जेटिनाला आवरण्यात बचावपटू यशस्वी ठरले. त्यामुळे आणखी गोलही झाला नाही. पण, संघाला जेव्हा खरी गरज होती, तेव्हा हरमनप्रीतने मात्र पेनल्टी कॉर्नरची संधी सोडली नाही. (Paris Olympic 2024)
Captain Clutch! 🇮🇳💪
Harmanpreet Singh scored when it mattered most to equalize against Argentina at #Paris2024 🙌
Keep watching the Olympic action LIVE on #Sports18 & stream for FREE only on #JioCinema 👈#Cheer4Bharat #OlympicsonJioCinema #OlympicsonSports18 pic.twitter.com/dqQFY7M3PH
— JioCinema (@JioCinema) July 29, 2024
(हेही वाचा – बिहारमधील पूल कोसळण्याच्या घटनांबाबत Supreme Court ने राज्य आणि केंद्र सरकारकडून मागवले अहवाल)
दुसऱ्या क्वार्टरपासून भारताच्या आघाडीच्या फळीचा खेळ खरंतर सुधारला होता. भारताने धडाधड पेनल्टी कॉर्नरही मिळवले. संपूर्ण सामन्यात १० वेळा भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु यातील फक्त एकावरच संघाला गोल करता आला. पेनल्टी कॉर्नरवरील भारताचं अपयश नक्कीच चिंतेची बाब ठरणार आहे. (Paris Olympic 2024)
सध्या मात्र साखळीतील एक विजय आणि एक बरोबरी यामुळे भारतीय संघाने साखळीतील आपलं आव्हान कायम राखलं आहे. ही बरोबरी भारतासाठी महत्त्वाची होती कारण, इथून पुढे भारताचा मुकाबला आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जिअमशी होणार आहे. शेवटच्या दोन लढती भारतासाठी आव्हानात्मक ठरणार आहेत. प्रत्येक गटातून पहिले ४ संघ उपउपांत्य फेरीत जातील. (Paris Olympic 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community